औरंगाबाद | प्रतिनिधी| ( सचिन चव्हाण):
संपुर्ण विश्वात कोरोना महामारीने हाहाकार माजविल्याचे विदारक दृश्य सगळीकडे दिसत आहे ,या महामारीचा भारतालाही फटका बसल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाचे भारतात लाॅकडाऊन केले आहे.
या काळात ज्यांचे हातावर पोट आहे,घरात पैसा नाही ,शासकीय मदत नाही अशांची उपासमार होत आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन भटके विमुक्त संघर्ष समिती च्या वतीने औरंगाबाद येथील कँसर हॉस्पिटल चे प्रमुख डॉ.अरविंद गायकवाड यांना याबाबत विनंती केली होती त्या विनंती नुसार भटक्या समाजातील गरीब कुटूंबाना अनुक्रमे झाल्टा फाटा येथील मदारी कुटुंबियांना तसेच बेंबडे हॉस्पिटल येथील वैदू कुटुंबियांना , सेवन हिल लगत वसलेल्या शिकलकरी समाज व वडार समाजातील कुटुंबीयांना अन्न धान्य वाटप करण्यात आले.
या कार्यासाठी डॉ. अरविंद गायकवाड, विश्वदीप करंजीकर , यांचे भटके- विमुक्त संघर्ष समितीच्या वतीने आभार मानण्यात आले .तसेच या कामासाठी सो. सो. खंडाळकर , के. ओ. गिरे, आर. जे. जेठे, अंबादास रगडे यांनी सहकार्य केले. या साठी संघटनेचे अध्यक्ष टी. एस. चव्हाण व सचिव दुर्गदास गुढे यांनी परिश्रम घेतले.