पुणे | प्रतिनिधी | सचिन विटकर
संपुर्ण विश्वात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरस ने महाराष्ट्रात रोद्र रुप धारण केले आहे. याचबरोबर पुणे जिल्हयातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील कुंभारवाड्यातल्या घरातील एका महिलेला दोन-तीन दिवसापासून एका खाजगी दवाखान्यात निमोनीया झाल्यामुळे उपचार चालू होते, त्या दरम्यान सदर महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली तर ती पाॅझिटिव्ह निघाली आहे.त्यामुळे परिसरातील वातावरण भितीदायक निर्माण झाले आहे.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे कोरोना पहिला रुग्ण सापडल्याची माहिती मिळताच तालूका आरोग्य डाॅ.अजित करंजकर यांनी तत्काळ तेथे धाव घेत पुढील कार्यवाही सुरु केली आहे .अशी माहिती डाॅ.करंजकर यांनी दिली आहे.
सर्वात भयानक हे वाटते की,या खाजगी दवाखान्यामध्ये तीन दिवसांमध्ये अनेकांची ये जा झालेली आहे,त्यात रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक, पालकही आल्याचे दिसून येत आहे. यासर्वांचा शोध घेऊन तेथील डाॅक्टर व त्यांचे कर्मचारी सहित बंदिस्त करणे आवश्यक आहे.
सबंधित माहिती मिळताच तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण,तालुका अधिकारी डाॅ.अजित करंजकर,गटविकास अधिकारी संदिप जठार यांनी पिरंगुट येथे धाव घेतली. अजुनही त्या घरातील दोन - तीन व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असू शकतात.
या संशयितांचा तत्काळ शोध घेण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.


