अहमदनगर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पार्श्वभुमीवर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले की, आपला देश कोरोना महामारी संकटात सापडला आहे. यासाठी संपुर्ण देशातील नागरिक मला सहकार्य करीत आहेत, परंतू हा आजार खुप मोठ्या प्रमाणात पसरत आहे. याचे दु:ख आहे, तरी या आजाराला न घाबरता प्रत्येकाने आपआपल्या घरात राहुन प्रशासनाला मदत करून कोरोना लढा खंभीरपणे द्यायचा आहे.
रविवार दि.५ एप्रिल २०२० रोजी रात्री ठिक ९ वाजता फक्त ९ मिनिटे कुठलीही गर्दी न करता सामाजिक अंतर ठेऊन घराच्या ओट्यावर किंवा व्हरांड्यात (बालकनित) एका जागेवर विशिष्ट अंतरावर उभे राहुन दिवा,पणती ,मेणबत्ती, बॅटरी,मोबाईल फ्लॅशलाईट,टाॅर्च लावून देशातील १३० करोड जनतेबरोबर मी हा लढा लढत आहे.याचा सर्वांनाच आभास होईल त्यायोगे हा आजार आपण नक्कीच पळवून लावू. असे त्यांच्या भाषणादरम्यान मोदीजी म्हणाले. हे सर्व आपल्या घरातील सर्व विजेचे दिवे विजवून आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी हे करायचे आहे हे त्यांनी आवर्जुन सांगितले.
1962 मध्ये चिन युद्धा नंतर 1965 मध्ये पाकिस्तान सोबत युध्द सुरू झालं. त्यावेळी भारताची परिस्थिती बिकट होती. भारत दुसऱ्या देशांकडून अन्नधान्याची आयात करत होता. अमेरिकेने धमकी दिली अन्नधान्याची आयात करू नका. अशा युध्दजन्य परिस्थिती मध्ये पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या समोर येवुन सांगितले की" माझ्या घरची चूल आठ दिवस पेठणार नाही " आणि मग काय " जय जवान जय किसान जय भारत. असे म्हणत येवढ्या बिकट परिस्थितीत भारताने युध्द जिंकले. नंतर भारतात देवीच्या रोगाने थैमान घातले जगातली 60% रोगाची लागन आपल्या देशात झाली होती. 76 हजार लोक संक्रमित व 26 हजार लोकांचा बळी गेला होता.या परिस्थितीत देशाने यावर मात करून संकटातून मुक्त झाला.
आज कोरोना सारखा रोग...पुर्ण जगात थैमान घातले आहे. कितीतरी लोक मृत्युमुखी पडत आहेत. आज कोरोना व्हायरसच्या संक्रमणा मुळे. " जागतिक महामारी " घोषित करण्यात आली. देशातली ही पहिली वेळ अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा बंद करण्यात आले आहेत. मा. पंतप्रधान मोदी साहेब. मा. मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब. मा. उप मुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. मा. आरोग्य मंञी राजेशजी टोपे साहेब. व इतरअनेक मंत्रीगण हात जोडून भारत वासीयाना फक्त " 21" दिवस घरा बाहेर पडू नका असे विनंती करत आहेत. हि दक्षता घेतली तरच आपण " कोरोना व्हायरसला " covid 19 ला पळून लावण्यात यशस्वी होउ, या संकटावर आपण 21 दिवस घरात राहून यावर मात करु व कोरोनाचा नायनाट करू शकु.
आज पंतप्रधान मोदी साहेबांनी जनता जनार्दन ह्यांनाच मी दैवत समजतो असे जाहीररित्या सांगुन दि.5 एप्रिल 2020 रोजी रात्री 9 वाजता , फक्त 9 मिनिट घरातील सर्व लाइट, प्रकाशित दिवे बंद करुन, आपण कुठेही एकत्र न येता गर्दी न करता असेल तिथे घराच्या दारात, बाल्कनित येऊन पणती, दिवा, मेणबत्ती, बैटरी, मोबाइल फ़्लैश लाइट या पैकी एक गोष्टीचा वापर करुन एकाच वेळी सर्व देश प्रकाशमान करुन एक अलौकिक शक्ती निर्माण करूया.ज्यायोगे या लढ्यात मी एकटाच नसून देशातील 130 करोड नागरिक एकाचवेळी हा लढा देत आहेत.असे प्रत्येकाला वाटेल त्यांचा आनंद सर्वांना मिळेल.
ही विनंती केली आहे, तरी सर्वांनी याचा आदर राखुया...


