प्रधानमंत्री जनधन योजनेची माहे एप्रिल 2020 या महिन्याची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. महिला लाभार्थ्यांची बॅकेत एकाचवेळी गर्दी करु नये म्हणून दि.3 एप्रिल 2020 रोजी ज्या खातेदाराचे बॅक खाते क्रमांकाचा शेवटचा अंक 0 किंवा 1, दि. 4 एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक 2 किंवा 3 , दि. 7 एप्रिल रोजी खाते क्रमांकाचाशेवटचा अंक 4 किंवा 5, दि.8 एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक 6 किंवा 7 व दि. 9 एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक क्रमांक 8 किंवा 9 आहे त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार बॅकेतून पैसे काढण्यासाठी यावेत. एटीएम किंवा बिझनेस प्रतिनिधी पॉईट सुध्दा कार्यरत आहेत. ज्यांना वेळापत्राकानुसार पैसे काढणे शक्य होणार नाही. त्यांनी 9 एप्रिलनंतर नियमित बॅकेच्या वेळेत पैसे काढता येणार आहेत. लाभार्थ्यांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक संदीप वालावलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.