shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकाराने कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी.


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) 
           देश विदेशात सर्वत्र हाहाकार माजवणार्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या महाभयंकर संसर्गजन्य रोगामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना व्हायरसचे देशातील संक्रमण रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाची संक्रमण साखळी खंडीत करण्यासाठी संपूर्ण देशात सर्वत्र लाॅकडाऊन घोषित केले आहे.



         कोरोना व्हायरस मुक्तीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय आमदार माननीय भरतशेठ गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील महाड, गोरेगांव,पोलादपूर इत्यादी ठिकाणी कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली आहे.   

        महाड विधानसभा मतदार संघातील महाड शहर, महाड तालुका, पोलादपूर, महाड एमआयडीसी   गोरेगांव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकाराने  कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली असून यासाठी लागणारे अर्थसाह्य हे आमदार भरतशेठ गोगावले  यांनी उपलब्ध करून दिले आहे .या कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाचा शुभारंभ आमदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यासाठी सर्वांना पुढाकार घेतला पाहिजे. 
     


       या प्रसंगी आमदार भरतशेठ गोगावले , महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी ,संपर्क प्रमुख विजय सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक,शहर युवा अधिकारी सिद्धेश पाटेकर इत्यादी उपस्थित होते.

       यावेळी पुढे बोलताना आमदार भरत  गोगावलें यांनी संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्नशील आहे मात्र पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने महाड विधानसभा मतदार संघातील पोलिस ठाण्यासमोरील प्रवेश द्वाराजवळ करुणा निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय महाड चे उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील रायगड जिल्हय़ाचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी सर्वच ठिकाणी करण्यात यावी .या करिता सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा असून ग्रामपंचायत, नगरपालिका किराणा मालाचे दुकान भाजी मंडई ,सरकारी कार्यालय, गावचे,कारखान्याचे  प्रवेशद्वार या ठिकाणी कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात येताहेत याचा वापर करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आमदार गोगावले यांनी सांगितले .महाड औद्योगिक वसाहतीं मधील कारखान्यां कडून सी एस आर फंडातून  मधून आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम सुरू आहे.कोरोना सारख्या महामारी च्या काळामध्ये महाड उत्पादक संघटना व एमएमए सीईटीपी यांच्या माध्यमातून केले जाणारे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले.
close