सावळीविहीर | राजकुमार गडकरी |
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊनसुरूआहे.अशा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राहता तालुक्यातील रुई येथे ग्रामपंचायतीने नुकतेच मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्यामुळे गावाची सुरक्षा व कोण येते कोण जाते, यावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे, त्यामुळे गावात कुणीही विनाकारण फिरताना दिसत नाही. दिसल्यास तर सीसीटीव्ही कॅमेरा मार्फत त्यास पकडून कारवाई केली जात असल्याने येथे लॉकडाऊनचे नियम काटेकोर पाळले जात आहेत.
राहता तालुक्यातील रुई या गावात ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप बाबासाहेब बावळे, उपसरपंच ग्रामसेवक बी आर सांगळे ,सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या कल्पनेतून व ग्रामविकास निधीतून गावामध्ये मोक्याच्या ठिकाणी, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, मज्जिदच्या चौकात, सोसायटी परिसरात मंदिराच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी ,सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
गावात एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून दोनशे मीटरचा परिसर त्यामध्ये कव्हर केला आहे. या कॅमेऱ्यामुळे मुळे गावात कोण येते कोण जाते यावर नजर ठेवता येते. सध्या लॉक डाउन सुरू आहे, त्यामुळे विनाकारण गावात कुणी फिरत असल्यास त्यास ग्रामपंचायती वर लावलेल्या स्पीकर वरून सुचना करून समज दिली जाते. अन्याथा अशा व्यक्तींवर ग्रामपंचायत कारवाई करते, तसेच रात्रीच्या वेळी किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास ते लक्षात येते. या सीसीटीव्ही कॅमेरा मुळे गावात होणाऱ्या भुरट्या चोर्याचे प्रमाण कमी झाले आहे. सीसीटीव्ही लावल्यामुळे लॉकडाऊन चे काटेकोर अंमलबजावणी होत आहे, गावातील ग्रामस्थांची सुरक्षा आणखी मजबूत झाली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यालयातवर स्पीकर बसविण्यात आले असून या स्पीकर वरून विनाकारण फिरणाऱ्या लोकांना सूचना केली जाते या सूचनेचा अनादर केल्यास दंड करून कारवाई करण्यात येते. या कॅमेरामुळे पोलिसांवरचा ताण कमी झाला आहे.
ग्रामपंचायत प्रशासन सक्षम काम करीत आहे, या उपक्रमाबद्दल रुई गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.