shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. जमदाडे यांना नगर येथील मदरसा मध्ये क्वारांटाईन करायला लावणाऱ्या सूत्रधाराचा शोध घ्यावा. - मनसे जिल्हा अध्यक्ष - बाबासाहेब शिंदे.


श्रीरामपूर । प्रतिनिधी । विठ्ठल गोराणे:
श्रीरामपूर तालक्यामध्ये एक ही कोरोनो विषाणुमुळे बाधित झालेले रुग्ण नसतांना जमदाडे डॉक्टरांना नगर येथे का पाठविण्यात आले.डॉ. जमदाडे मार्गदर्शनाची तालुक्यातील नागरिकांना गरज आहे. कारण त्यांना तालुक्यातील प्रत्येक भागाची माहिती आहे. अनेक लोकांचे ते परिचित आहेत. अनेक दिवसांपासून गोरगरीब लोकांना सहकार्य व मदत करण्याचे काम त्यांनी केलेले आहे तसेच आज तालुक्यामध्ये कोरोना आजारामुळे भयभीत परस्थिती असल्यामुळे लोकांना त्यांच्या मार्ग दर्शनाची कमी भासत आहे.



मनसे जिल्हा अध्यक्ष - बाबासाहेब शिंदे.

   

नेवासा येथील कोरोनो रुग्ण येऊन अनेक दिवस झालेले असतांना व डॉ. जमदाडे व इतर सर्व डॉ.,कर्मचारी यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असतांना डॉ. जमदाडे यांनाच नगर येथील मदरसा मध्ये क्वारांटाईन करण्यात आले.तबलिकी जमात मुळे देशभर कोरोनोचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला तसेच नगर शहरामध्ये तबलिकि जमातीमुळेच अनेकांना कारोनोची लागण झालेली आहे असे असतांनाही डॉ. जमदाडे यांना क्वारानटाईन करण्यात आले. मदरस्यातील लोकांमुळे जर डॉ. जमदाडे यांना कोरोनोची लागण झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार व यांना जाणुनबुजून येथे आणायला लावणाऱ्या त्या व्यक्तीची चौकशी करून नाव जाहीर करण्यात यावे.तसेच सर्व राजकीय पक्षाची नेते डॉ. जमदाडेच्या बाजूने आहेत तर मग हे घाणेरडे राजकारण करतंय तरी कोण याचा शोध घेण्यात यावा व त्वरित डॉ. जमदाडे यांना श्रीरामपूरात आणण्यात यावे.अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा  मनसे जिल्हा अध्यक्ष :
बाबासाहेब शिंदे यांनी दिला आहे.
close