shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आण्णाभाऊंचा आदर्श : कवी चंद्रकांत शहासने यांचे कोरोना लोकजागरण

पुणे । प्रतिनिधी ।
आज कोरोनाच्या प्रचंड हाहाकारामुळे संपुर्ण जग हादरले आहे.त्यात भारतासह राज्यात कोरोना वैश्विक महामारी जलदगतीने पसरत आहे. या पार्श्र्वभूमीवर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि अष्टावधानी संतुलन फौंडेशनच्या विद्यमाने गीत गायनाच्या माध्यमातून जे लोकजागृतीचे कार्य चालू आहे ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीरांनी दिलेल्या योगदानाच्या धर्तीवर आहे असे संस्थेचे विश्वस्त श्री चंद्रकांत शहासने यांनी सांगितले.


          
 शाहीर अण्णाभाऊसाठे,अमरशेख,गव्हाणकर,
आत्माराम पाटील यांनी शाहिरी पोवाडे यांतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राण ओतले. याच धर्तीवर पुण्याचे कवी चंद्रकांत शहासने यांनी प्रथम कोरोना जागृती करीता अनेक कविता केल्या. या कविता सोशल मिडीयातून प्रसारीत होताच काही हौशी गायकांनी या गीतांना चाली लावून त्यांचे विडीओ शहासने यांना पाठविले. संस्थेने हे व्हिडिओ  गीतास अनुसरून चित्रमय केले व पुन्हा सोशल मीडियात प्रसारीत केले.    

अशा प्रकारच्या या निस्वार्थ लोकजागृतीचे कामास जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असून कोरोना विरोधी जनजागृती होत आहे. याचे मनस्वी समाधान मिळत असल्याचे कवी चंद्रकांत शहासने यांनी शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधीशी व्यक्त करताना सांगितले.
close