shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर साईबाबांच्या कृपेने साईनिवारा येथे साई आश्रयाचे बांधकाम पूर्ण....!!

शिर्डी/ प्रतिनिधी - कु. किरण जाधव :
आज दि. 24/4/2020 वार शुक्रवार रोजी साईबाबांच्या कृपें ने अखेर पिंपळवाडी रोड साईनिवारा येथे साई आश्रयाचे बांधकाम  पूर्ण झाले.



 तेंव्हा सर्व साईआश्रया परिवार 105 मुले व 11 वयोवृद्ध तसेंच 5 निराधार महिला असा एकूण 121 अंकाचा साईआश्रया परिवार  याठिकाणी आज आपल्या हक्काच्या घरात  राहण्यासाठी आले आहे तेंव्हा आज कलश पूजा करून हळदी कुंकवाच्या ताटात मुलांनी पाय ठेऊन प्रवेश केला व साईबाबांची आरती करून सर्वांना भोजन प्रसाद देण्यात आला तसेच साईआश्रयातील गौऊ मातेला वासरू झाले असा शुभ साई योग घडून आला  जगातील कोरोना महामारी मुळे सगळीकडे लॉक डाउन आहे त्यामुळे  कार्यक्रम पुढे घेण्याचे ठरले आहे तरी या साईछत्र निर्माण होणे कामी दैवत मा. काकासाहेब कोयटे व मा. संदीप भाऊ कोयटे समता परिवार तसेच मा.गौरवजी कौशल व अनेक दानशूर देव माणसे या मुळेच साईआश्रया परिवाराला छान घर मिळाले आम्ही कुठल्याही शब्दात आभार मानू शकत नाही परंतु आपले सहकार्य हे अनाथ व निराधार मुलांच्या उज्वल भविष्य करिता आहे  तेंव्हा अनेक देव माणसांनी केलेलें सहकार्याची परत फेड ही अनाथ मुले डॉक्टर, वकील, पोलीस, ऑफिसर व चांगले नागरिक होऊन माणुसकी या नात्याने  आपल्या देशातील गरीब अनाथ निराधार माणसांची मनोभावे सेवा करतील अशी शिकवण या मुलांना देऊन हे साई सेवा कार्य यशस्वी करतील तेंव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व दानशूर देव माणसांचे आभार व अभिनंदन केल्या चे समाधान  व साईआश्रयाचे सेवा कार्य चे  सार्थक होईल.
close