- बेजबाबदार घोषणा करणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका प्रशासनावर सरकारकडून कार्यवाही होणार?
अंबरनाथ - जाफर वणू
अंबरनाथ शहरात 4 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये एका रुग्णाचे मयत झाले होते. आणि उर्वरित 3 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र एका मृत्यु कोरोनाची पत्नी, मुलगा आणि एक संशयात सापडलेली महिलेचा म्हणजेच एकूण 3 कोरोना रिपोर्ट येणे बाकी असताना सुद्धा अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी देविदास पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अंबरनाथ शहर कोरोना मुक्त झाल्याचे जाहिर केल्याचे नगरपालिकेच्या या सावल्या गोंधलाबाबत चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी व तहसीलदार यांच्यात ताळमेळ नसल्याने दिसत आहे. याबाबत तहसीलदारांशी विचारना केली असता अद्याप 3 रिपोर्ट येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर 1 रुग्ण आढल्यानंतर 28 दिवसापर्यंत हे शहर निरिक्षणाखाली ठेवण्यात येते. कारण यावेळेत नवीन रुग्ण आढळू शकतो. अशी माहिती तहसीलदारांनी दिली.
याच बरोबर पहिले रुग्ण आढळून 28 दिवस उलटले नसताना सुद्धा मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क न करता अंबरनाथ शहर कोरोना मुक्त कसे घोषित केले असल्याचे चित्र समोर दिसून येत आहे. परंतु मुख्याधिकारी यांनी दिलेल्या महितीच्या आधारे अनेक प्रसारण माध्यमातून काही पत्रकारांना हाताशी धरून पेड बातमी देऊन अंबरनाथ शहर मुक्तच्या बातम्या प्रसारित केल्याने अंबरनाथ शहरात कोठेतरी चूकीचा संदेश पसरलेला असल्याने पोलिस प्रशासनाची डोकेदुःखी अधिक वाढली आहे. कोरोनासारख्या विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन व संचारबंदी लागू केले असून सुद्धा नागरिक नियमाचे उल्लघन करून घराबाहेर पड़ताना दिसून येत असल्याने पोलिसांना यावर कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. अशा बेजबाबदार घोषणा करणाऱ्या नगरपालिका प्रशासनावर सरकारकडून कोणत्या प्रकारची करवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


