shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलिसाला लुटणारे तीनजण १२ तासात गजाआड..!


पिंपरी-चिंचवड 
पिंपरी ( पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करुन लुटणाऱ्या आले होते. याप्रकरणी तीन आरोपींना मुद्देमालासह 12 तासात गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाडून अटक केली. ही घटना चाकण जवळील रासे गावच्या हद्दीत घडली होती.अश्विन अरुण रोकडे (वय 27), शाहरुख इजाजखॉं पठाण (वय 22), प्रतिक योगीराज खडसे (वय 21, तिघेही रा. अरुण कुसाळकर यांचे प्लॅटमध्ये, शिक्रापुर रोड, चाकण, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

इंदरकुमार तुकाराम धोत्रे हे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते चाकण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर काम करतात.




वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास धोत्रे हे सरकारी गणवेशामध्ये ड्यूटीकरीता आळंदी घाट मार्गे दुचाकीवरून चाकणकडे जात होते. ते चाकणजवळील रासे गावच्या हद्दीत आले असता अनोळखी तीन इसमांनी त्यांना डोक्‍यात मारुन खाली पाडले. त्यानंतर लाकडी दांडक्‍यांनी लाथांनी मारहाण करुन जबर दुखापत केली तसेच त्यांचेकडील मोबाईल व रोख रक्कम एटीएम कार्ड तसेच क्रेडीट कार्ड असा एकुण नऊ हजार रुपयांचा ऐवज जबरी चोरी करुन चोरुन नेला. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या शोधाकरिता तीन तपास पथके तयार केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांना बातमीदाराकडून आरोपींबाबत माहिती मिळाली की चाकणमध्ये एका दुचाकीवरून तिघेजण मोबाईल विक्रीसाठी फिरत आहेत. त्यानुसार शिक्रापुर रोडवर संशयित आरोपींना हटकताच ते पळून जावू लागले. पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून गुन्ह्यातील फिर्यादी यांचा मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली बजाज डिस्कव्हर मोटर सायकल असा एकुण 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त (गुन्हे) सुधिर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक सुधिर अस्पत, शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक सतिश कांबळे, उपनिरिक्षक गिरिष चामले, कर्मचारी विजू कांबळे, पठाण, सानप, चव्हाण, विवेकानंद सपकाळे, नितिन पराळे, यदु आढारी, नाथक केकान, योगेश कोळेकर, सचिन मोरे, त्रिनयन बाळसराफ, सागर जैनक, राज हनमंते, प्रमोद ढाकणे, मेहश भालचिम, शशिकांत नांगरे, अरुण साबळे, अमोल साकोरे, सचिन उगले, तांत्रिक विश्‍लेषक हवालदार नागेश माळी, राजेद्र शेटे यांनी केली आहे.
close