shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Coronavirus : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांसाठी ‘व्हॉटस्अप चॅटबूट’ची सुविधा सुरू

पिंपरी-चिंचवड:
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेमार्फत Whatsapp मोबाईल क्रमांकाद्वारे Chatbot ची सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याद्वारे Covid-19 बाबत नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन होणार आहे. कोरोना विषाणूची लक्षणे काय आहेत? त्याकरीता कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी,  Covid-19 चाचणी केव्हा करावी? अशा प्रकारची विविध माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यादृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आज गुरुवार दि. २३.०४.२०२० रोजी Covid-19 संदर्भातील अद्ययावत माहितीकरिता ‘Whatsapp द्वारे Chatbot’ ची सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. 



Whatsapp द्वारे महानगरपालिकेशी संपर्क साधणेसाठी 9922501450 हा नंबर आजच आपल्या मोबाईलमध्ये  Save करुन Hi असे टाईप करुन संपर्क साधल्यास खालील माहितीचा मेनू महापालिकेमार्फत आपल्या मोबाईलवर पाठविणेत येईल व त्यातील पसंतीक्रमानुसार नागरिक इच्छित माहिती प्राप्त करु शकतात.

१. Covid -19 तपासणी केंद्र. 

२. जेष्ठ नागरिकांसाठी मोफत औषध वितरण 

३. मोफत अन्न वितरण केंद्रांची यादी 

४. तक्रार नोंदणी 

५. Covid -19 माहिती पुस्तिका 

६. Covid -19  चाचणी केव्हा करावी ?  

७. Covid -19  संदर्भात कोणती काळजी घ्यावी व काय करु नये.

अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहेत. तसेच इतर अत्यावश्यक सेवांसाठी नागरिक 8888006666 या सारथी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करु शकतात.
close