shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रूपीनगर परिसरातील २६ वर्षीय तरूण कोरोनाबाधित; शहरात आजपर्यंत ६८ जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’

पिंपरी-चिंचवड:
पिंपरी चिंचवड शहरातील रुपीनगर परिसरातील एका २६ वर्षाच्या तरुणाचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ४८ वर पोहचली आहे. आजपर्यंत ६८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी २० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.



महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने बुधवारी (दि.२२) संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज (गुरुवारी) आले आहेत. त्यामध्ये २६ वर्षीय तरुणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. हा रुपीनगर परिसरातील रहिवासी आहे. त्याला कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली याची माहिती समजू शकली नसून वायसीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
close