पिंपरी-चिंचवड:
पिंपरी चिंचवड शहरातील कोविड – १९ च्या रुग्ण वाढीची गती कमी झाल्याचे निदर्शनास आले असल्याने संपुर्ण महापालिका क्षेत्रास कंटेनमेंट झोन घोषित करण्याची आवश्यकता राहीली नसल्याने पिंपरी चिंचवड शहरातील १६ ठिकाणांचे परिसरात कंटेनमेंट झोन सोमवार दि.२७ एप्रिल २०२० रोजी रात्री १२.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत घोषित करणेत येत असून सदर परिसराच्या सर्व सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येत आहेत. त्यानुसार संबंधित पोलिस प्रमुख या भागाच्या हद्दी सील करतील तसेच, सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व या परिसरातील सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत असल्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
साथरोग नियंत्रण अधिनियम , १८९७ (एपिडमीक अक्ट) मधील तरतूदी नुसार, खालिल नमुद क्षेत्रातील परिसरास कंटेंनमेन्ट झोन घोषीत करणे आले असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
‘कंटेनमेंट झोन’चा परिसर खालील प्रमाणे
०१) खराळवाडी परिसर, पिंपरी – जामा मस्जिद, खराळवाडी या भोवतीचा परिसर, पिंपरी (गिरमे हॉस्पिटल – अग्रेसन लायब्ररी, क्रिधा ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी, खराळ आई गार्डन, ओम हॉस्पिटल, ओरियंटल बॅंक, सिटी प्राईड हॉटेल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल)
०२) पीएमटी चौक परिसर भोसरी – पाटील हॉस्पिटल पिएमटी चौक, मारुती मंदिर, पिसिएमसी पाणी टाकी, भोसरी जुने हॉस्पिटल, विश्वविलास बिर्याणी हाऊस.
०३) गुरुदत्त कॉलनी परिसर, भोसरी – भोसरी आळंदी रोड, बिकानेर स्विट्स, एच पि पेट्रोल पंप, बालाजी मंदिर, भारत पेट्रोल पंप, दुर्वांकुर लॉन मागिल बाजु, न्यु मिलान बेकरी, हरी ओम स्विट्स, महा-ई सेवा केंद्र, ममता स्विट्स, आनंद हॉस्पिटल.
०४) रामराज्य प्लॅनेट परिसर, कासारवाडी – सि एम ई हद्द, 7 Apple हॉटेल, सिधार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस.
०५) गणेश नगर परिसर, दापोडी – पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दि टॉवर्स, माता शितळादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यु मिलेनियम इंग्लिश स्कुल.
०६) शास्त्री चौक परिसर, भोसरी – संत ज्ञानेश्वर प्रार्थमिक शाळा, परफेक्ट इलेक्ट्रिल, व्यंकटेश मेडीकल, महानगर को-ऑप. बॅंक, भोसरी आळंदी रोड.
०७) संभाजीनगर परिसर, आकुर्डी – हॉटेल शिवशंकर, तुळजाभवानी मंदिर, बॅंगलोर बेकरी, कस्तुरी मार्केट.
०८) रोडे हॉस्पिटल परिसर, दिघी – महा-ई सेवा केंद्र दिघी, गुरुकृपा मॉल, अष्टविनायक दुध डेअरी, जान्हवी ट्रेडर्स.
०९) तनिष्क ऑर्किड परिसर, चऱ्होली – तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द.
१०) कृष्णराज कॉलनी परिसर, पिंपळे गुरव – पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी, पवना नदी किनारा.
११) नेहरुनगर बस डेपो परिसर, भोसरी – जनता सहकारी बॅंक, नुरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हैद्राबाद बिर्याणी हाऊस.
१२) कावेरीनगर पोलिस लाईन परिसर, वाकड – बी एस एन एल टेलिफोन एक्सचेंज, Seseme शाळा रस्ता, Infant Jesus High School, अण्णाभाऊ साठे नगर.
१३) रुपीनगर परिसर, तळवडे – दिपक ग्लास सेंटर, स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्ती शक्ती बस डेपो.
१४) फातीमा मशिद गंधर्वनगरी परिसर मोशी – जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सुर्योदय, PAMU हायड्रोलिक्स, मोशी कचरा डोपो, पुणे नाशिक हायवे.
१५) विजयनगर परिसर, दिघी – शिवशंकर आपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, गणेश सुपर मार्केट, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर रोड, व्ही आर एल कुरिअर सर्व्हिसेस.
१६) आदिनाथ नगर परिसर, भोसरी – पुणे नाशिक हायवे, एच पी गॅस, आदिनाथ नगर मेन रोड, निलकंठेश्वर मंदिर, रुपी को-ऑप बॅंक, आई मॅटर्निटी होम, राज मेडिकल, सरस्वती को-ऑप बॅंक ATM.
या कंटेनमेंट झोन मध्ये
१. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.
२. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बॅकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते ०२:०० या वेळेत सुरु ठेवाव्यात तसेच आपली ए.टी.एम.केंद्रे कार्यान्वीत ठेवावीत.
३. कंटेनमेंट क्षेत्रात सदर काळात सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील. तसेच उर्वरीत क्षेत्रात दुधाची किरकोळ विक्री सकाळी ६:००


