हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.28 जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गावांना रात्री भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे परिसरातील नागरीक भयभीत होऊन घराबाहेर पडले होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना ही घटना समजताच त्यांनी मध्यरात्रीच तात्काळ या गावांना भेटी देऊन नागरिकांना धीर दिला.
मागील पाच दिवसापासून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. काल(दि.27 ) रोजी रात्री 11 च्या सुमारास वसमत तालुक्यातील गिरगाव,परजना, कोठारी सुकळी, चोंडी आंबा, शिंदे पांगरा, कुरुंदा तर कळमनुरी तालुक्यातील पोत्रा,सिंदगी या गावांना भूकंपाचे एकापाठोपाठ एक असे चार पाच धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपाचे धक्के जरी सौम्य असले तरी मागील काही दिवसांपासून असे धक्के बसत असल्याने अनेक घरांना तडे गेले आहेत. अगोदरच कोरोनाच्या धास्तीने नागरिक भयभीत असून भूकंपाच्या धक्क्याने नागरिक आणखी भयभीत झाले आहेत. खासदार हेमंत पाटील यांना ही बाब रात्री समजताच त्यांनी मध्यरात्री तात्काळ या गावांना भेटी देऊन भयभीत झालेल्या नागरिकांना धीर देऊन घाबरून न जाण्याचे आवाहन केले व सोशल डिस्टन्स ठेवून घराबाहेर पडण्याचे सांगून या बाबत कधीही कोणतीही मदत सर्वोतोपरी करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा प्रशासन व महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना देखील खासदार हेमंत पाटील यांनी दिल्या आहेत . तसेच लातूर येथील भूकंप मापक यंत्रावर या धक्यांची किती तीव्रता नोंद झाली आहे याची माहिती घेण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.
खासदार हेमंत पाटील यांनी या भागातील गावांना पहाटे ४ वाजेपर्यन्त भेटी देऊंन नागरिकांशी सवांद साधला. यावेळी सभापती राजेश इंगोले पाटील, संभाजी सिद्धेवार, शंकरभाई कऱ्हाळे, डॉ सोमेश्वर पतंगे, मन्मथ सिद्धेवार, जि.प.सदस्य बाळासाहेब मगर ,बालाजी देवकर, सोमनाथ रणखांब, विद्याधर मगर आदी उपस्थित होते.