अंबरनाथ (जाफर वणू):
देश व राज्यभरात कोरोना सारख्या भयंकर विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दि. 24 मार्च रोजीपासून सरकारने लॉकडाउन घोषित केले होते. परंतु या "कोरोना वायरस" चा संसर्ग टळत नसल्याचे लक्षात घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याव्दारे ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यापासुन घरात थांबलेल्या बेरोजगार नागरिकांना कामधंदा नसल्याने उपासमारीची वेळ लक्षात घेत तसेच त्यांना "काम नाही, तर पैसा नाही, मंग जगायचे कसे" हा प्रश्न त्यांच्यासमोर येताच नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपा नगरसेवक किरण शंकर भोईर यांच्या हस्ते वॉर्ड क्रं. 14 मधील रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांना, जेष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग (अपंग) असलेल्या हजार लोकांना घरोघरी जाऊन मोफत जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली. ही मदत करत असताना सोशल डिस्टेंसची विशेष काळजी घेतली गेली. त्याच बरोबर दि. 17 एप्रिल रोजी बदलापूर पोलिस ठाणे पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी जाऊन पोलिस कर्मचारी तसेच एस.टी. बस चे कर्मचारी असे मिळून २५० जणांना मास्क, सॕनीटायझर, हॕण्ड ग्लोव्हज् , डेटाॕल साबण, एनर्जी ड्रिंक्स, खोकल्यावरील औषधांचे वाटप सुद्धा करण्यात आले. तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याचेही नगरसेवक किरण भोईर त्यांनी सांगितले.
तसेच सरकारकडून लॉकडाउन घोषित झाल्यापासून भाजपा नगरसेवक किरण भोईर यांनी येथील गोरगरीब नागरिकांना पहिले प्रथम मास्क व सॕनीटायझर वाटप करण्यात आले तसेच दैनंदिन नागरिकांना लगणाऱ्या जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. त्यामुळे वॉर्ड क्र. 14 या परिसरतील नागरिकांनी लाॕकडाऊनच्या काळात नागरीकांपर्यंत धान्य, जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी सहकार्य केलेल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.