shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्पर्धा परिक्षेसाठी दिल्लीत गेल्येल्या 1500 विद्यार्थ्याचा घरी येण्याचा मार्ग मोकळा - आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा - दि. 11 मे 2020
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपा मुळे स्पर्धा परिक्षेसाठी दिल्लीत गेल्येल्या 1500 विद्यार्थ्याचा घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आभार व्यक्त केले. स्पर्धा परिक्षेसाठी दिल्लीत गेल्येल्या राज्यातील विद्यार्थ्याना घरी येण्यास परवानगी मिळावी यासाठी राहुरी तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क समन्वयक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे केली होती. 




ढुस यांनी मुख्यमंत्री महोदयांना  लिहलेल्या ई मेल पत्रात म्हंटले होते की,    महाराष्ट्रातील जवळपास 1500 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी दिल्ली मधे गेलेले आहेत. हे सर्व विद्यार्थी राज्यात परत येण्यासाठी सर्व ऑनलाइन प्रक्रिया करीत आहेत. तथापी दिल्ली सरकारकडून त्यांना अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही. दिल्ली सरकारच्या परवानगी अभावी हे सर्व विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. तरी अपणास विनंती की, सोबत जोडून सादर केलेल्या राज्यातील स्पर्धा परिक्षा अभ्यासक्रमातील मुलांची यादी तपासुन राज्यातील या 1500 विद्यार्थ्याना घरी येण्यासाठी दिल्ली सरकारसोबत आपण कृपया  चर्चा विनिमय करावी.. व या मुलांना राज्यात आणण्यासाठी तातडीने आवश्यक ती उपाययोजना करावी. 

ढुस यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या माहीतीसाठी  व पुढिल योग्य त्या कार्यवाही साठी या  विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय यादी जोडून सादर केली होती. 
मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांचे कडून  या बाबत तात्काळ माहिती मागविली असुन तसे पत्र आज ढुस यांना प्राप्त झालेने  लवकरच हे सर्व विद्यार्थी राज्यात परत येतील असा विस्वास आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केला.
close