बुलढाणा। प्रतिनिधी :
देशामध्ये कोरोना व्हायरस मूळे सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून लाॅकडाऊनचा तिसरा टप्पा चालू आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून दि. २२ मार्च पासून देशात लाॅकडाऊन लागू केले आहे. यानंतर हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी भटक्या-विमुक्त व वडार समाजावर उपासमारीची वेळ आलेली असताना या पार्श्वभुमीवर आपण समाजाचे काहितरी देणं लागतो. समाजाच्या वंचित घटकांना आपण जरूर दिलेच पाहिजे या उद्देशाने बुलढाणा येथील रहिवासी असलेले अखिल महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते शामराव पवार यांनी देवपूर येथील 47 गरजूं वडार मजूरांना आपल्या परिने मदत करून उतराई होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
शामराव पवार यांनी सामाजिक कार्य करताना आजपर्यंत अनेक गरजूंना शिक्षणासाठी मदत, गरिब विद्यार्थांना कपड्यांची मदत आणि अनेकांना दवाखाना खर्च अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन व मोफत वधू वर मेळाव्यासाठी देणगी दिले आहे. त्यांनी देवपूर येथील गरजूंना जीवनावश्यक साहित्य मदत दिल्यामुळे तेथील सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.



