हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.01 जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज एक मे महाराष्ट्र दिनी शुक्रवार रोजी यात विक्रमी वाढ होऊन एकाच दिवशी एसआरपीएफच्या 25 जवानांना कोविड 19 ची लागण झाल्याचा अहवाल आज सकाळीच प्राप्त झाला यात कळमनुरी तालुक्यातील एका गावातील व्यक्ती जो नांदेड येथून पंजाबला भाविक घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वर कार्यरत होता. त्याला कोरोनाची लागण झाली आहे तो नांदेड येथे भरती आहे तर हिंगोलीत पंचवीस रुग्ण उपचाराखाली आहेत. जिल्ह्याची संख्या आता 47 वर पोहोचली आहे.
यातील एक जण कोरोना मुक्त झाला आहे. एसआरपीएफ हिंगोलीच्या पंचवीस जवानाचे आज एक मे रोजी सकाळी नव्याने अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील वीस जवान क्वारंटाईन सेंटर एसआरपीएफ येथे भरती होते व पाच जवान आयसोलेशन वार्ड मध्ये भरती आहेत. या सर्व जवानांचे अहवाल पूर्वी निगेटिव्ह आले होते नव्याने तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण एसआरपीएफ च्या 41 जवानांना आतापर्यंत कोविड 19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील 33 जवान मालेगाव येथे तर 8 जवान मुंबई येथे कार्यरत होते कळमनुरी तालुक्यातील एका मोठ्या गावातील 25 व्यक्ती 25 वर्षीय व्यक्ती जो खाजगी ट्रॅव्हल्स वर कार्यरत आहे 23 एप्रिल रोजी भाविकांना सोडण्यासाठी नांदेड येथून पंजाब येथे गेला होता. 28 एप्रिल रोजी नांदेड येथे परतल्यानंतर त्याला शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती सध्या नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे भरती आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण 47 कोविड 19 चे रूग्ण झाले आहेत एक व्यक्ती बरा होऊन निगेटिव्ह झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत 46 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. रुग्ण शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे भरती आहे व एक रुग्ण औरंगाबाद येथील धुत हॉस्पिटल मध्ये भरती आहे. 45 रुग्ण हिंगोली येथे उपचारा खाली आहेत. हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. जिल्ह्याने रेड झोन मध्ये या अगोदरच प्रवेश केला आहे. शुक्रवारच्या आकडेवारीवरून जिल्ह्यांसाठी मोठी चिंतेची बाब समोर आली आहे. एकाच दिवशी 25 जवानासह जिल्ह्यातील एका पंचवीस वर्षे व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हिंगोली करांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.