shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकारांचे प्रश्नाचे कुणाही पक्षाने राजकारण करु नये पत्रकार संघानी अधिक सावध रहाण्याची गरज : सुधीर मेहता यांचा इशारा


अ.नगर । प्रतिनिधी :-  पत्रकारांचे प्रश्न महत्वाचे आहेतच राहुल कुलकर्णी अर्णव गोस्वामी आणी टाइम्स नाउ च्या पत्रकारांवरील अन्यायाकिरोधात .. सर्व पत्रकार त्यांच्या पाठीशी आहेत .. त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी पत्रकार संघटना सर्व मार्गाने  प्रयत्न करताहेतच मात्र या विषयांचे निमित्त करुन पत्रकारांचे नाव घेऊन कुणी  राजकारण करु नये असे आवाहन राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे  महासचिव आणि प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता यानी केले आहे .



पत्रकारांचे अनेक महत्वाचे विषय व प्रश्न गेली अनेक वर्षे धुळ खात पडलेत. कोरोना हा सरकार समोर सर्वात  जटील विषय  असल्याने आम्ही पत्रकारांनी  आमचे महत्वाचे विषय तुर्त स्थगीत ठेवले आहेत. मागील सरकारच्या काळात झालेले अन्याय,पेन्शन, पत्रकार संरक्षण कायदा, अधि स्विकृती पत्र  आणि वृत्तपत्रांचे नोंदणी  जाहिरातीसह सर्व विषयातील अन्याय आम्ही विसरलो नाहीये. ज्या सरकारने माहिती जन संपर्क कार्यालय पत्रकारांसाठी ठप्प पाडले होते, पत्रकारानाच संचलनालयात प्रवेश नव्हता. अनेक वृत्तपत्रे बंद पडण्याची वेळ आलीय, केंद्र व राज्य सरकार कडे मागील पाच सात वर्षे  आम्ही त्यासाठी निकराने पाठपुरावा करतोय परंतू कुणीही  पत्रकाराना न्याय तर दिला नाही पण पत्रकारांचे कुणी ऐकुनही घेतले नाही अशी खंत सुधीर मेहता यानी व्यक्त केली ..

आज मात्र प्रथमच विरोधी पक्षांचे नेते पत्रकार, दहशतवाद
संपादकांवर आणीबाणी गळचेपी  असे विषय घेऊन राज्यपालांना भेटले पत्रकारांच्या प्रश्नासाठी कुणी नेते प्रथमच पुढे येत असेल तर त्यांचे स्वागतच आहे मात्र राजकारणासाठी  विरोधी अन सत्ताधारी कुणी पत्रकारांच्या प्रश्नात राजकारण ही पक्षाने करु नये अशी विनंती सुधीर मेहता यानी केली आहे ..

कोरोनाचे संकट असताना खरे तर कुठलेच राजकारण  देशात नकोय असे सांगतानाच कोरोना नंतर वृत्तपत्रे आणी पत्रकारितेला अनेक आव्हानांचा सामना  करावा लागणार आहे.अनेक प्रश्न नव्याने निर्माण   होणार आहेत त्यावेळी आम्हांला सर्वांच्या सहकार्याची गरज लागणार असल्याचे आणी त्यावेळी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन सुधीर मेहता यांनी केले आहे.

मोदीन्ना समर्थन !!!
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना  २ एप्रील रोजीच महांघाचे चेअरमन सुरेश कदम अध्यक्षा रुणु हजारिका  यानी पत्र देउन Lock Down ला पाठिंबा आणी सर्व सहकार्याचे आश्वासन दिले आहे . पत्रकारांचे संपुर्ण संरक्षण  केंद्र आणी राज्य सरकारानी करावे वृत्तपत्र वितरणासह अनेक प्रश्न  राष्ट्रीय पत्रकार महासंघ नवी दिल्लीने आग्रहाने मांडले असल्याचे महासचीव सुधीर मेहता यांनी सांगितले.

कोरोना संकटात आम्ही  देशात मोदीजींबरोबर तर राज्यात मुख्यमंत्री उधव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीतदादा आणी सरकार बरोबर आहोत असे स्पष्ट करुन सुधीर मेहता यांनी सरकार अथवा विरोधी पक्ष कुणीही  पत्रकारांचे प्रश्न आणी नावाचा दुरुपयोग करु नये एव्हढीच  माफक अपेक्षा असल्याचे सुधीर मेहता म्हणाले ..

सुधीर मेहता National Media Confedration  चे राष्ट्रीय महासचीव आणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी र्यांचेकडेच आहे ..

सुधीर मेह्ता
राष्ट्रीय पत्रकार महासंघ : नवी दिल्ली.
close