shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

35 वर्षीय मंतीमंद महिलेवर बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; आरोपीला चार दिवसाची पोलीस कस्टडी

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.29,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथे शेत शिवारातील आखाड्यावर एका 35 वर्षीय अविवाहित मतीमंद महिलेवर एका नराधमाने सलग तिन दिवस जबरदस्ती बलात्कार केला त्यामुळे मतीमंद महिला गरोदर राहीली आहे.या प्रकरणी त्या नराधमावर सेनगांव पोलीस ठाण्यात दि.28 मे गुरूवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला 12 तासाच्या आत अटक करून सेनगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची(सोमवार पर्यंत) पोलीस कस्टडी दिल्याची माहीती पो.उ.नि.बाबुराव जाधव यांनी शिर्डी एक्सप्रेस न्युज शी बोलतांना दिली.



मागील चार ते पाच महिन्यापुर्वी पिडीत मंतीमंद महिला हि फिर्यादीच्या शेतातील आखाड्यावर पत्राच्या खोलीत एकटीच असल्याचे पाहुन आरोपीने संधीचा फायदा घेऊन तिथे येऊन ती पिडीत महिला मतीमंद असल्याचे माहीत असुन ही पिडीतेची ईच्छा नसतांना ही जबरदस्तीने तिचे तोंड रूमालाने बांधुन तिच्या सोबत सलग तिन दिवस बलात्कार केला.व तु कोणाला काही सांगितले तर मी तुला जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्या पिडीतीने या घटनेबाबत कोनाला ही सांगितले नाही.चार ते पाच महिन्यानंतर त्या मतीमंद पिडीतेला गर्भधारणा झाल्याने तिने या घटनेबद्दल घरच्यांना सांगितले. पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात आरोपी रमेश अर्जुनराव लांडे(30) याच्या विरोधात गु.र.नं.कलम 195/2020 कलम 376(2) (जे)(एल)(एन),448,506 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सेनगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
close