shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपल्याकडे जावयाचे 4 प्रकार पडतात..!!

१) साखऱ्या जावई :

साधारण २ टक्के जावई या प्रकारात मोडतात.
हे जावई १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. 
त्या मुळे हे वर्ष दोन वर्षातून सासुरवाडीला जातात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड- धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून यांचा मानपान होतो. चांगलीच बडदास्त असते याची.
म्हणून हा साखऱ्या जावई...!!
जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...!!


२) भाकऱ्या जावई :

या प्रकारात ९५ टक्के जावई मोडतात. हे जावई सासुरवाडी च्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. 
हे सासुरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे लागते. याचे जाणे नेहमीचे असते त्या मुले या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते..!! 
हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो, म्हणून हा भाकऱ्या जावई..!!

३) ढोकऱ्या जावई :

या प्रकारात २ टक्के जावई सापडतात. हे घरजावई असतात. या जावयाला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्यावा लागतो. झाड लोटीची कामे पण करावी लागतात. 
हा घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेसतरी याचा अपमान नक्किच केला जातो. म्हणून हा ढोकऱ्या जावई..!!

4) दयावान जावई:
हा जावई सासरच्या लोकांना  कायम मदत करतो. बायकोच ऐकतो .मेहुण्याला उसने पैसे देतो.त्याला सासरचे मंडळी त्याला  कायम सासरच्या मंडळानी गोड -गोड बोलुन हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हा 1/2 वर्षातुन सासरी येतो, त्यावेळी  त्याचेकडे आजूबाजूचे लोक दयेने बघतात .

आता तुम्हीच ठरावा तुमच्या घरात तुम्ही  कोणते जावई  आहात ते...??

माहिती संकलन :
श्री.आणा विटकर 
जामखेड.
close