हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.02 मे कोरोनामुळे सध्या जिल्ह्यामध्ये वाहन बंदी आहे त्यामुळे वयोवृद्ध,अपंग,बाळांतपण पेशंट यांना रूग्णालयात जाण्यासाठी अनेक वेळा वाहन भेटत नाही किंवा गरजुकडे वाहनच नाहीत अशा रूग्णांना हिंगोली वाहतुक शाखेतर्फे नि:शुल्क विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली.हिंगोली पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांच्या शुभहस्ते आज दि.02 मे शनिवार रोजी उदघाटन करून वाहन सुरू करण्यात आले आहे.
कोरोना विषाणुचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार ने संपूर्ण लाॅकडाऊन केल्यामुळे सध्या हिंगोली जिल्ह्यात ही वाहन बंदी आहे त्यामुळे वयोवृद्ध,अपंग,बाळांतपण पेशंट यांना रूग्णालयात जाण्यासाठी अनेक वेळा वाहन भेटत नाहीत त्यामुळे त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने व काही वयोवृद्ध एकटेच किंवा जोडप्याने राहातात त्यांना दवाखान्या पर्यंत नेण्याची जबाबदारी हिंगोली वाहतुक शाखेने उचलली आहे.यासाठी हिंगोली वाहतुक शाखा यांनी दोन अॅटो मोफत सेवेसाठी उपलब्ध करून दिले असुन या रूग्णांच्या प्रवासाचा खर्च वाहतुक शाखा उचलत आहे.अॅटोमध्ये सोशल डिस्टन्स साठी पडदे लावले असुन प्रत्येक वेळी सेनेटाइज केले जात आहे.तरी खरंच गरजु रूग्ण आहेत अशा व्यक्तींनी वाहतुक शाखा मो. नं.8669900673, एसडीपीओ ऑफीस मो.नं.7385912946,चालक राजु मो.नं.7385912946 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन हिंगोली वाहतुक शाखेचे स.पो.नि चिंचोलकर साहेब यांनी केले आहे.सदरची विशेष सेवा हिंगोली शहर एसडीपीओ श्री वैजने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक श्री काळे साहेब यांच्या उपस्थितीत पोलीस अधिक्षक योगेश कुमार साहेब यांच्या शुभहस्ते आज उदघाटन करून नि:शुल्क सेवेची सुरूवात करण्यात आली आहे.