shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव(हिंगोली) रो.ह.यो.अंतर्गत विहीरीचे खोदकाम मजुराऐवजी जेसीबीने करण्याचा भाजपा पदाधिका-याचा पराक्रम

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.2 मे हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील सुकळी(बु) येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीरीचे खोदकाम करणे अनिवार्य असतांना हे खोदकाम एक भाजपा पदाधिकारी चक्क जेसीबी मशिनव्दारे काम करीत असल्याचा पराक्रम समोर आला आहे.



हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील सुकळी(बु )येथील सेनगांव भाजपा तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल यांना शासनाकडून एमआरजीएस अंतर्गत विहीर मंजूर झाली आहे.त्या विहीरीचे मस्टर पंचायत समिती सेनगांव या ठिकाणी सादर केले आहे.सदरील विहीरीचे काम हे रोजगारा मार्फत होत असल्याचे दाखविण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात हे काम जेसीबी मशिनव्दारे करून घेण्याचा पराक्रम चालविला आहे.यामुळे गोरगरीब मजुरांना काम मिळत नाही. रोजगारांच्या नावावर बोगस मस्टर दाखवुन बिल काढल्या जाणार आहे.या प्रकरणी सुकळी बु येथील रोजगार सेवक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,जर हे काम जेसीबी मशिनव्दारे झाले असेल तर आम्ही याचे मस्टर तयार करणार नाही व बिल काढणार नाही.तरी सदर कामाकडे एमआरजीएस चे इंजिनिअर व वरीष्ठ अधिका-यानी लक्ष देऊन हे काम रोजगारा मार्फत करून घ्यावे अशी मागणी सर्वसामान्य मजुराकडुन होत आहे.ऐकीकडे संपुर्ण देशासह हिंगोली जिल्हा लाॅकडाऊन असतांना सर्वसामान्य मजुरांना काम मिळत नाही व लाॅकडाऊन काळात अशा प्रकारे जेसीबी मशिनव्दारे काम करून घेतल्याची माहीती समोर आली आहे.तरी प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन संबंधित लाभधारकास कोणत्या ही परीस्थितीत बिल मंजुर करू नये व बोगस मंजुर लाभार्थी दाखवुन बिल हडपण्याचा हा प्रयत्न शासनाने हानुन पाडावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.
close