राहुरी तालुक्यातील तब्बल पाच हजार शेतकरी पिक विम्या पासुन वंचित..!!
> मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज - आप्पासाहेब ढुस
देवळाली प्रवरा - दि. 28 मे 2020
राहुरी तालुक्यातील जवळपास पाच हजार शेतकरी पिक विम्या पासुन वंचित असुन त्या सर्व वंचित शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळणे साठी देवळाली प्रवरा येथील शेतकरी तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना पत्र पाठवून विनंती केली आहे.
ढुस यांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, राहुरी तालुक्यातील 15270 शेतकरी बांधवांनी खरीप 2019 (कांदा, कपासी, तुर, भुईमूग आदी पिके) साठी ए.आय. सी. कंपनी कडे शासना मार्फत पिक विमा नोंदविला होता त्या पिक विम्याच्या हप्त्या पोटी उपरोक्त शेतकरी बांधवांनी 35,96,434/- रुपये भरले आहेत. त्यापैकी 10503 शेतकरी बांधवांना 6,50,82,000/- रुपये विमा संरक्षीत रक्कम म्हणून मिळाली आहे.
तथापी राहुरी तालुक्यातील 4419 शेतकरी अद्यापही पिक विम्या पासुन वंचित आहेत. त्यामधील 3350 कापूस लागवड केलेल्या शेतकरी बांधवांनी 36,21,559/- रुपये विमा हप्ता भरला आहे. 653 कांदा लागवड केलेल्या शेतकरी बांधवांनी 20,60,310/- रुपये विमा हप्ता भरला आहे. 323 तुर लागवड केलेल्या शेतकरी बांधवांनी 1,15,315/- रुपये विमा हप्ता भरला आहे, आणि भुईमूग लागवड केलेल्या 93 शेतकरी बांधवांनी 19,235/- रुपये विमा हप्ता भरला आहे. अश्या पद्धतीने राहुरी तालुक्यातील 4419 शेतकरी बांधवांनी भरलेल्या 58,16,419/- रुपये पिक विमा हप्त्याची संरक्षित रक्कम जवळपास तिन कोटी रुपये ए.आय.सी. कंपनी कडून राहुरीच्या शेतकरी बांधवांनाअद्याप मिळणे बाकी आहेत.
राहुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या विमा संरक्षित रक्कमे साठी सदर कंपनीला व त्यांचे प्रतिनिधीला माहिती विचारणे साठी फोन केला असता कोरोना लॉक डाऊन चे कारण पुढे करुन माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. खरिपाची 2020 साठी लागवडी सुरु झाल्या तरी 2019 चा विमा अद्याप 4419 शेतकरी बांधवांना मिळणे बाकी असल्याने येथील शेतकरी बांधव हवालदील झाला आहे.
तरी आपणास विनंती की , राहुरी तालुक्यातील 4419 शेतकरी बांधव आजही 2019 खरिपाच्या पिक विम्या पासुन वंचित वंचित असल्याने सदर शेतकरी बांधवांची विमा संरक्षित रक्कम त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यासाठी संबंधित विभागाला योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी करुन मुख्यमंत्री महोदय नेहमी प्रमाणे हा प्रश्नही तात्काळ मार्गी लावतील असा विस्वास व्यक्त केला आहे.

