shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा नगरपरिषदेने घरपट्टी / पाणी पट्टी व शास्ती मध्ये सूट देवून राज्या समोर आदर्श निर्माण करावा - आप्पासाहेब ढुस

*देवळाली प्रवरा नगरपरिषदेने  घरपट्टी / पाणी पट्टी व शास्ती मध्ये सूट देवून राज्या समोर आदर्श निर्माण करावा - आप्पासाहेब ढुस* 

देवळाली प्रवरा - दि. 29 मे 2020
       देवळाली प्रवरा नगरपरिषदेने  घरपट्टी / पाणी पट्टी व शास्ती मध्ये सूट देवून असी सूट देणारी राज्यातील प्रथम नगरपरिषद होण्याचा बहुमान प्राप्त करून आदर्श निर्माण करावा असे मत आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
    कोरोना मुळे आर्थिक संकटाचा सामना करित असलेल्या जनतेला घरपट्टी व पाणी  पट्टी मध्ये 25% आणि  शास्ती मध्ये 100% सूट मिळावी यासाठी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे, व राज्य मंत्री मा. ना. प्राजक्तदादा तनपूरे यांना पाठविलेल्या पत्रात नुकतीच विनंती केली आहे.    
      त्याचीच एक प्रत आज देवळाली प्रवरा नगरपरिषदेला देवून त्यामध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेने घरपट्टी / पाणी पट्टी व शास्ती मध्ये सर्वप्रथम सूट देणारी प्रथम नगरपरिषद होण्याचा बहुमान प्राप्त करून राज्या समोर आदर्श निर्माण करावा अशी स्वतंत्र विनंती ढुस यांनी नगरपरिषदेला केली आहे.
     आप्पासाहेब ढुस यांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, कोरोना लॉक डाऊन कालावधी मध्ये राज्यातील सर्व प्रकारचे उद्योग धंदे बंद झाले आहेत. राज्यातून जवळपास दोन कोटी लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यामूळे नागरिकांचे उद्योगा सोबत घर भाडे पासून मिळणारे उत्पन्न सुद्धा थांबले आहे. म्हणून सर्व बाजुने आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील जनतेला या कोरोना लॉक डाऊन काळात घर पट्टी व पाणी पट्टी मध्ये सरकारने सवलत देवून दिलासा देने गरजेचे आहे.

        म्हणून या आर्थिक वर्षात नगरपरिषदे कडून आकारल्या जाणार्या घर पट्टीतून लॉक डाऊनच्या तिन महिन्याची सवलत देण्यासाठी सर्वांना एकुण घरपट्टी च्या सरसकट 25% सवलत मिळणे गरजेचे आहे.तसेच दर तीन महिन्या नंतर घर पट्टी बिल भरले नाही तर बिला मध्ये प्रती माह 2% शास्ती म्हणून दंड आकारला जातो. कोरोना मुळे हे आर्थिक वर्ष राज्यातील नागरिकांना अत्यंत हालाखिचे जाणार आहे. त्यामूळे घर पट्टी बिलात लावली जाणारी प्रती माह 2% शास्ती मध्ये सुद्धा सर्वांना सरसकट 100%  सूट मिळणे आवश्यक आहे.
         कोरोना च्या प्रादुर्भाव मुळे राज्यातील जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने राज्यातील सर्व  नगरपरिषदेच्या घरपट्टी बिला मध्ये जर 25% सवलत दिली व प्रतिमाह लागणारी 2% ची शास्ती 100% माफ केली म्हणून राज्याच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त बोजा वाढणार नाही. उलट अशी सवलत विशिष्ट मुदतीसाठी लागू केली तर नागरिक आनंदाने मुदतीत कर भरतील. व त्यामूळे नगरपरिषदेवर सुद्धा कोणताही बोजा पड्णार नाही. आणि या सवलती मुळे नागरिक सुद्धा कर भरण्यास प्रोस्थाहीत व प्रेरित झालेने नगरपरिषदांचा वसुली वाढीस लागुन मुदतीत कर वसुल होइल. असा निर्णय यापूर्वी मुंबई महानगर पालिकेने घेतला असल्याचे ऐकिवात आहे. 
     तरी राज्यातील सर्व नगरपरिषदेच्या घरपट्टी बिला मध्ये सरसकट 25% सवलत देवून बिला मध्ये प्रती माह लागणारी शास्तीसुद्धा सरसकट सर्वांना 100% माफ करावी तसेच पानी पट्टी मध्ये सुद्धा 25% सवलत लागू करने कामी संबंधीत विभागाला योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती ढुस यांनी केली आहे.
           त्याचीच एक प्रत आज देवळाली प्रवरा नगरपरिषदेला देवून त्यामध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेने  घरपट्टी / पाणी पट्टी व शास्ती मध्ये सर्वप्रथम सूट देणारी प्रथम नगरपरिषद होण्याचा बहुमान प्राप्त करून  राज्या समोर आदर्श निर्माण करावा अशी ढुस यांनी नगरपरिषदेला विनंती केली आहे.
       आप्पासाहेब ढुस यांची ही विनंती देवळाली प्रवरा नगरपरिषदेने मान्य केल्यास देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना याचा लाभ होणार असल्याचे मत ढुस यांनी व्यक्त करुन देवळाली प्रवरा नगरपरिषद लवकरच आमची मागणी मान्य करील व देवळालीच्या नागरिकांना कोरोना च्या या संकट समयी आर्थिक दिलासा देईल असा विस्वास व्यक्त केला. 
close