येवला |प्रतिनिधी(संतोष राऊळ):
काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गामुळे प्रकाश झोतात आलेले येवले शहरात प्रशासनाने घेतलेल्या काळजी मुळे तसेच आरोग्य सेवक आणि शिक्षकांच्या सहकार्याने आज येवल्यात एकही कोरोना रुग्ण नसून बऱ्याच स्तरातून कोरोना साठी काळजी घेताना नागरिक दिसता आहे.
याच पार्श्वभूमीवर येवल्यातील श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे " स्वामी मुक्तानंद विद्यालयात " सॅनिटायझरेशन करण्यात आले. या शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ. श्री. अमृतनाना पहिलवान व सचिव श्री. दिपकभाऊ गायकवाड तसेच इतर संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे प्राचार्य श्री. दत्तात्रय नागडेकर यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण विद्यालयात सॅनिटायझरेशन करण्याचे काम हाती घेतले. येवले शहरातच नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नावाजलेली ही संस्था असून या विद्यालयात विध्यार्थी संख्याही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सदर परिस्थिती पाहता शाळा चालू होण्याआधी विद्यालयाने केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर विद्यालयात सर्व विधार्थी, शिक्षक तसेच इतर कर्मचारी वर्गाची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते असे प्राचार्यानी विश्वास दिला असून विद्यालयासह संपूर्ण परिसर सॅनिटायझरेशन करण्यात येत आहे. या कार्य प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्यांसह उपप्राचार्य श्री. खैरे सर , उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री. ढोले सर , तसेच किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य श्री. सोमवंशी सर, तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री.गायकवाड सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. पैठणकर सर, श्री. पहिलवान सर, श्री. धिवर सर, विद्यालयाचे काही शिक्षक तसेच शिपाई कर्मचारी वर्ग उपस्थित असून सर्वांनी सहकार्य केले.


