देवळाली प्रवरा -
विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत लागणारी कागदपत्रे तातडीने उपलब्ध होनेसाठी राज्यातील महा ई सेवा केंद्र (सेतु) तातडीने सुरू कारा असी विनंती देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना दि. 19 मे 2020 रोजी ई मेल द्वारा पाठविलेल्या पत्रात केली होती. त्याची मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेवून त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. त्यामूळे राज्यातील महा ई सेवा केंद्र (सेतु) लवकरच सुरु होवुन विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याने आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री महोदयांचे हार्दिक आभार व्यक्त केले. आप्पासाहेब ढुस यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले होते की, राज्य शासन राज्यातील लॉक डाउन हळू हळू सिथिल करीत आहे. त्यामूळे राज्यातील शाळा महाविद्यालये लवकरच सुरू होतिल यात शंका नाही.
जुन 2020 पासून मुलांच्या नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. काही पदवी आणी पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे ऑनलाइन अभ्यास व परिक्षेसाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मात्र या ऑनलाइन शैक्षणिक प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याकरिता आवश्यक असणारे कागतपत्र मिळण्यासाठी राज्यातील सर्व महा ई सेवा सेतू कार्यालय बंद असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. सध्या विविध कोर्सेस च्या प्रवेशासाठी असणाऱ्या जसे की Neet UG, PG, AI AP GET व इतर काही परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागतपत्रे जसे की, EWS Certificate, उत्पनाचा दाखला, Caste Certificate ची आवश्यकता आहे. तथापी सेतू कार्यालय बंद असल्याने विध्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. तसेच सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी विविध कागदपत्रांची जुन जुलै मधे गरज पडनार आहे व त्याची तरतूद आत्ताच होणे आवश्यक आहे अन्यथा ऐनवेळी सेतु कर्यालयामधे मोठी गर्दी उसळेल. व प्रशासना समोर मोठा पेच प्रसंग निर्माण होणार आहे.
करिता राज्यातील महा ई सेवा केंद्र (सेतु) सुरू करने बाबत आवश्यक ती उपाययोजना करने कामी संबंधीत विभागाला योग्य ते आदेश द्यावेत असे ढुस यानी नमुद करुन हा प्रश्न नेहमी प्रमाणे मुख्यमंत्री महोदय तातडीने मार्गी लावतील असा विस्वास व्यक्त केला होता. आज दि. 21 मे 2020 रोजी अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा. राहुल द्विवेदी साहेब यांनी महसूल विभागाच्या उपजिल्हधिकारी साहेब यांना या कामी पुढिल कार्यवाहिचे आदेश दिलेने आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब व अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा. राहुल द्विवेदी साहेब यांचे आभार व्यक्त केले.


