सावळीविहीर।राजकुमार गडकरी।
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र विविध उपाय योजना करण्यात येत आहे. लॉक डाऊन सुरू असून शिर्डीत लॉकडाउनचा चा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.अशा परिस्थितीत शिर्डीत शांतता सुव्यवस्था राहावी, कुणीही विनाकरण बाहेर फिरू नये," घरात रहा, सुरक्षित रहा "असे सांगत सर्वांनी लॉक डाऊन चे नियम पाळावेत व राहता तालुक्यात, शिर्डी परिसरात एकही रुग्ण आढळला नाही व यापुढेही कोरोणा मुक्त शिर्डी राहावी म्हणून शिर्डी पोलीस, शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी असे सर्वांनी मिळुन शिर्डीत आज पथसंचलन केले.सर्व कोरोना वारियर्स आणि त्या पाठीमागे पोलीस ,महसूल यांची वाहने यांचा रूट मार्च काढण्यात आला.सर्व शिस्तबद्ध पद्धतीने शिर्डी शहरातून कनकुरी रस्त्याने, श्रीराम नगर असा रूट मार्च करण्यात आला.या रोड मार्च च्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी बाहेर येत या सर्व पोलिस व कोरोणा वारियर्सवर पुष्पवृष्टी केली तर काहिनी शंख वाजून या कोरोना वारियर्सचे स्वागत केले. हा रूट मार्च शिर्डी करांनी शांतता व सुव्यवस्था राखावी, लॉक डाऊन चे नियम पाळावेत, यासाठी काढण्यात आल्याचे सांगताना शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे म्हणाले की, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. येथे एकही कोरोणा रुग्ण अद्याप नाही.
येवला येथील एक कोरोणा ग्रस्त डॉक्टर अगोदर आपल्या मूळ गावी शिर्डीला आपल्या घरी येऊन गेले होते त्यामुळे शिर्डीतील इस्लामपूर भागात या डॉक्टरांच्या घरी व परिसरात संपूर्ण सॅनिटायझेशन करून हा सर्व परिसर पूर्णतः बंद करण्यात आला आहे व या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, लॉक डाऊन चे नियम काटेकोर पाळले जावेत, यासाठी हा रूट मार्च असून कुणी विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आत्तापर्यंत शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालया अंतर्गत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 130 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापुढेही विनाकारण फिरणार-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिला. शिर्डीत लॉकडीउनच्याच्या काळात पोलिसांनी काढलेला हा रूट मार्च व या रूट मार्चमधील पोलिसांवर नागरिकांनी केलेली पुष्पवृष्टी, आज शिर्डीत लक्षवेधी ठरली.सर्वांनी लॉक डाउन चे नियम पाळत या कोरोना वॉरियर्सचे मोठे स्वागत व अभिनंदन केले.