हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.30,आपण सर्व समाजबांधव लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे शासनाने लाॅकडाऊन केल्याने शासनला सहकार्य करीत सोशल डिस्टीनसिंगचे पालन करूण सर्व समाजबांधवानी दि.31 मे रविवार रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी यांची जयंत्ती आपण आपल्या कुटुंबासह घरीच साजरी करावी असे आवाहन धनगर समाजे नेते तथा मा.आ. रामरावजी वडकुते यांनी केले आहे.
चोंडी तालुका जामखेड जिल्हा नगर येथे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन त्याठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते परंतु यावर्षी कोरोना या महामारी मुळे आपल्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण फार मोठ्या संख्येने सापडत आहेत त्यापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्यावर उपाय म्हणून लॉक डाऊन केले आहे त्यामुळे आपल्याला कुठेही जमाव करता येत नाही म्हणून सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून आपण आपल्या कुटुंबासह जसे की आत्ताच परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा बसेश्वर, संभाजी महाराज इत्यादी महामानवाची जयंती आपण सोशल डिस्टन्स पाळुन घरीच साजरी करून अभिवादन केले त्याचप्रमाणे त्याच उत्साहात आपण आपल्या कुटुंबियानां सोबत घेऊन लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपण आपल्या घरीच साजरी करावी असे आवाहन धनगर समाजाचे नेते मा.आ.रामरावजी वडकुते यांनी केले असुन राज्य मल्हार सेनगांव तालुकाध्यक्ष गंगारामजी फटांगळे माजी पंचायत समिती सदस्य विकास शिंदे,आत्माराम कुंदर्गे, सचिन पाटील, विनायक हराळ, संजय चिलगर,डॉ.पावडे,राजू रवने,डॉ. घुले,सुनील शिंदें संतोष शिंदे संदीप पोले यांनी केले देखील समाजबांधवाना तसे आवाहन केले आहे.

