हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.30,सध्या कोरोना या महाभयंकर रोगाने देशासह महाराष्ट्रात थैमान घातले असुन अशा परीस्थितीत विविध रूग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असुन जनतेने रक्तदान करावे असे आवाहन केले होते.
या आवाहनाला सेनगावकरांनी प्रतिसाद देत सेनगांव येथे नागरीकांच्या वतीने आज दि.30 मे शनिवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
देशासह महाराष्ट्रात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असुन हिंगोली जिल्ह्यात ही कोरोना बाधीतांचा आकडा 75 वर गेला आहे.अशा बिकट परीस्थितीत विविध रूग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत सेनगांव शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सेनगांव शहरातील व्हि.के.देशमुख मंगल कार्यालयामध्ये सोशल डिस्टीनसिंगचे पालन करीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले व पोलीस कर्मचा-यांनी देखील रक्तदान केले तर हिंगोली शासकीय रक्तपेढीचे डाॅ.सोळंके,डाॅ. जिरवणकर,डाॅ. जटाळे यांनी सहकार्य केले.यावेळी नगरसेवक उमेश देशमुख,जगन्नाथ देशमुख,सतिश खाडे,प्रविण महाजन,संदीप देशमुख,राजकुमार देशमुख सह सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर,पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव,पोलीस उपनिरीक्षक माखणे आदी उपस्थित होते.

