हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.30,सेनगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी पो.हे.काॅ.एकनाथ शिंदे हे दि.31 मे ला सेवानिवृत्त होत असल्याने आज दि.30 मे शनिवार रोजी सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमाचे पालन करीत निरोप सभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पो.हे.काॅ.एकनाथ शिंदे ब.नं.347 यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावले असुन सध्या ते सेनगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते.शिंदे हे दि.31 मे रविवार रोजी आपल्या पोलीस सेवेतुन सेवानिवृत्त होत असल्याने सेनगांव पोलीस स्टेशन मध्ये त्यांना निरोप देण्यासाठी आज दि.30 मे शनिवार रोजी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर,पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव,पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माखणे,अनिल भारती यांनी शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी पोलीस कर्मचारी महादु शिंदे,तुळशिराम वंजारे,भिमराव चिंतारे,जगन्नाथ देशमुख सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

