सावळीविहीर ।राजकुमार गडकरी:
शिर्डी जवळच असणाऱ्या रांजणगाव देशमुख येथून चोरी गेलेली महिंद्रा पिकअप जीप चा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, अहमदनगर यांनी लावला असून ही जीप चोरी करणारे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,दिनांक 17 मे रोजी रात्री एक वाजता साकीर जाकिर इनामदार हा सोनू नजीर शेख व दीपक प्रभाकर सावंत यांच्याबरोबर महिंद्रा पिकअप जीप नंबर एम एच 45/ 93 52 यामध्ये डिझेलचे बॅरल घेऊन रांजणगाव देशमुख येथे हे समृद्धी महामार्ग साठी लागणाऱ्या खडी क्रेशर ला डिझेल देऊन परत संगमनेर कोपरगाव रोडने देर्डे-कोऱ्हाळे तालुका कोपरगाव येथे येत असताना रांजणगाव परिसरात एम एस ई बी सब स्टेशन जवळ उमेश तान्हाजी वायदंडे रा.गणेशनगर यांच्या सांगण्यावरून आकाश दीपक गायकवाड राहणार लक्ष्मी नगर शिर्डी.वय 20 ,तसेच संदीप दिलीप रजपूत राहणार बाभळेश्वर व आणखी एक लहान मुलगा यांनी पाठीमागून दोन मोटरसायकल वर येऊन ही महिंद्रा पिकअप अडवून या जिप मधील व्यक्तींना मारहाण करून धाक दाखवून खाली उतरून त्यांच्याकडील दोन मोबाईल व पिकअप जीप व ATM असा एकूण मुद्देमाल दोन लाख 65 हजार रुपयाचा चोरून नेला होता, यासंदर्भात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह व श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सह त्यांच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख ,गणेश इंगळे ,मोहन गाजरे ,मनोहर गोसावी, बाळासाहेब मुळीक शंकर चौधरी, विशाल दळवी रवींद्र कर्डिले ,रवींद्र सोनटक्के भागिनाथ पंचमुख ,ज्ञानेश्वर शिंदे प्रकाश वाघ, संदीप चव्हाण विजय धनेकर ,संभाजी कोतकर व सचिन कोळेकर यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.विविध पथकामार्फत हा तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने या गुन्ह्याचा तपास करून उमेश वायदंडे ,आकाश दीपक गायकवाड, संदीप दिलीप रजपूत व एका लहान मुलाला अटक केली आहे व चोरी गेलेला मुद्देमालासह या चोरीसाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.अधिक तपास पोलिस करीत आहे.

