हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.28,देशव्यापी लाॅकडाऊन हळुहळू शिथिल होतांना जवळपास सर्वच छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे.परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाईन,डिजीटल तसेच उच्च प्रशिक्षीत करणा-या संगणक व टायपींग संस्था सुरू करण्यास शासनाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत त्यामुळे संगणक व टायपींग संस्था अडचणीत आल्या आहेत.गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून या संस्था बंद असुन मासिक उत्पन्न ठप्प झाले असुन या संस्थाना शासनाकडुन कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्याने संस्थाचालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे सेनगांव शहरातील ग्रामिण काॅम्प्युटर चे संचालक भास्कर मोरे यांनी शिर्डी एक्सप्रेस न्युज शी बोलतांना सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात ब-याच संगणक व टायपींग संस्था आहेत या ठिकाणी 1 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंतचे विविध कोर्सेस शिकविल्या जातात आणि या माहीती तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल विद्यार्थी तसेच टायपींग एक्सपर्ट घडविण्याचे कार्य केल्या जाते.या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापोटी मिळणा-या फिस मधुनच संस्थाचालक व कर्मचा-यांचा उदरनिर्वाह होतो.मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून ह्या संस्था बंद असल्याने ऊत्पन्नाचा स्त्रोतच बंद झाला आहे.प्रतिवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये दहावीचे विद्यार्थी वेगवेगळ्या संगणक व टायपींग कोर्सला प्रवेश घेऊन विविध कौसल्य शिकतात.परंतु यावर्षी ऐन उन्हाळी सुट्टीतच कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आला आणि तो निर्णय योग्यही होता कारण "जान है तो जहान है" परंतु मागील पाच विद्यार्थ्यांचे प्रवेश नसल्यामुळे संस्थाचालकांना संस्थेचा सर्व खर्च घरूनच करावा लागला त्यातच हजारो रूपये खर्च करून उन्हाळी बॅचची जाहीरात ही केली.संस्थाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो विद्यार्थी विविध कोर्सचे प्रशिक्षण घेऊन व टायपींगचे कौशल्य आत्मसात करून शासनाच्या विविध जाहीरातीसाठी पात्र होतात.या विद्यार्थ्यांच्या फिसमधुनच संस्थाचालक संस्थेचा किराया,कर्मचारी पगार तसेच घरखर्च भागवतो.आता टायपींगचे दुसरे सत्र सुरू होते त्या अनुषंगाने आता तरी शासनाने संगणक व टायपींग संस्था सुरू करण्यास परवानगी द्यावी.प्रशिक्षण घेतांना आधीच विद्यार्थ्यांमध्ये अंतर असते कारण एकावेळी जास्तीत जास्त 10 ते 15 विद्यार्थ्यीच संगणकावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन कौशल्य शिकतात.त्यामुळे सोशल डिस्टीनसिंगचा वापर करणे शक्य आहे.तसेच सॅनिटायझर,हॅडवाॅशची सुविधाही संस्थेमार्फेत केल्या जाणार आहेत सध्या हिंगोली जिल्ह्यात नाॅन रेड झोनमध्ये जवळपास सर्वच उद्योगांना शासनाने परवानगी दिली आहे.त्याच धरतीवर मार्गदर्शन सुचना,अटी व शर्ती या संस्थांना सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी अपेक्षा हि भास्कर मोरे यानी बोलतानी व्यक्त केली.
प्रतिक्रिया:-
मी दिव्यांग असुन ग्रामिण विद्यार्थ्यांना संगणक व टायपींगचे कौशल्य शिकविण्याचे काम करतो माझे हजारो विद्यार्थी शासकीय/निमशासकीय क्षेत्रात काम करतात.माझ्या संस्थेला शासनाचे कोणते ही अनुदान नाही.आज माझी संस्था बंद असल्याने बॅकेचे हप्ते,किराया,लाईट बिल तसेच घरखर्च कसा भागवायचा हा गंभीर प्रश्न आहे.त्यामुळे नाॅन रेड झोन मधील ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी संस्था शासनाच्या मार्गदर्शक सुचना अटी व शर्ती घालुन चालु करण्यास शासनाने परवानगी द्यावी.
भास्कर शं.मोरे,
संचालक,ग्रामिण काॅम्प्युटर सेनगांव


