shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी जवळील निमगावात कोरोना महिला रूग्ण..राहाता तालुक्यात कोरोनाचा शिरकाव..!!

सावळीविहीर (राजकुमार गडकरी):
शिर्डी लगतच असणाऱ्या निमगाव येथे पन्नास वर्षे भाजी विक्री करणारी महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचा रिपोर्ट आज बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला असून त्यामुळे शिर्डी व परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.राहता तालुका आत्तापर्यंत कोरोना मुक्त होता. मात्र निमगाव येथील महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच राहता तालुक्यात प्रशासन व कोरोना वारियर्स युद्धपातळीवर कार्यरत झाले आहे.राहता तालुक्यातील व शिर्डी नजीक असणाऱ्या निमगाव येथील ही महिला भाजी विक्रीचे काम करते. निमगाव व सावळीविहिर आदी परिसरात ही महिला भाजी विक्री चे काम करत होती.तिला खोकला सर्दी अशी कोरोना सारखी लक्षणे आढळली, मात्र ती शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेली होती. तीन दिवस या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले होते, यावेळी हॉस्पिटलमधील दहा ते बारा आरोग्य कर्मचारी तिच्या संपर्कात आले असल्याचे समजते.तसेच तिच्या घरातील सात ते आठ व्यक्ती तिच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे काही नातेवाईक व भाजी घेणारे ग्राहक या महिलेच्या संपर्कात आल्याचे माहिती मिळत आहे.या सर्वांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले आहे असे समजते या महिलेचे लक्षणे  covid-19 सारखे दिसत असल्यामुळे तिचे स्राव नमुनेअहमदनगरला पाठवण्यात आले होते. आज सायंकाळी बुधवारी हा रिपोर्ट आल्यानंतर व या महिलेला कोरोना झाल्याचे समजताच संपूर्ण निमगाव तसेच राहता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 


आत्तापर्यंत राहता तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता, मात्र ही महिला कोरोनाबाधीत आढळल्याने राहाता तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  निमगाव येथे प्रशासनाचे आधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी ,तहसीलदार कुंदन हिरे, राहता तालुका पंचायत समितीचे बीडिओ समर्थ शेवाळे तसेच पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, आदींसह सर्व शासकीय कर्मचारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, कामगार तलाठी या सर्वांची बैठक होऊन निमगाव व परिसरातील या महिलेच्या संपर्कात कोणकोण आले त्यांचा तपास सुरू झाला आहे, या महिलेच्या घरातही सात-आठ व्यक्ती असल्याचे समजते ,ही महिला भाजीविक्रेता असल्यामुळे तिच्या संपर्कात अनेकजण येण्याची शक्यता असून या सर्वांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे   राहता तालुक्यात पहिला कोरोणाचा रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे, तालुक्यातील ,नागरिकांनी किंवा निमगाव येथील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, सर्व यंत्रणा सुसज्ज आहे ,सर्वांनी सोशल डिस्टंन्स, मास्क वापरावेत, विनाकारण बाहेर फिरू नये, गर्दी करू नये. प्रत्येकाने दक्षता घ्यावी, घरात रहा सुरक्षित रहा असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
close