घरपट्टी व पानी पट्टी मध्ये 25% आणि शास्ती मध्ये 100% सूट मिळावी - आप्पासाहेब ढुस
देवळाली प्रवरा - दि. 27 मे 2020
कोरोना मुळे आर्थिक संकटाचा सामना करित असलेल्या राज्यातील जनतेला घरपट्टी व पाणी पट्टी मध्ये 25% आणि शास्ती मध्ये 100% सूट मिळावी यासाठी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे, व राज्य मंत्री मा. ना. प्राजक्तदादा तनपूरे यांना पाठविलेल्या पत्रात विनंती केली आहे.
आप्पासाहेब ढुस यांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, कोरोना लॉक डाऊन कालावधी मध्ये राज्यातील सर्व प्रकारचे उद्योग धंदे बंद झाले आहेत. राज्यातून जवळपास दोन कोटी लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यामूळे नागरिकांचे उद्योगा सोबत घर भाडे पासुन मिळणारे उत्पन्न सुद्धा थांबले आहे. म्हणून सर्व बाजुने आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील जनतेला या कोरोना लॉक डाऊन काळात घर पट्टी व पाणी पट्टी मध्ये सरकारने सवलत देवून दिलासा देणे गरजेचे आहे.
म्हणून या आर्थिक वर्षात नगरपरिषदे कडून आकारल्या जाणार्या घर पट्टीतून लॉक डाऊनच्या तीन महिन्याची सवलत देण्यासाठी सर्वांना एकुण घरपट्टी च्या सरसकट 25% सवलत मिळणे गरजेचे आहे.
तसेच दर तिन महिन्या नंतर घर पट्टी बिल भरले नाही तर बिला मध्ये प्रती माह 2% शास्ती म्हणून दंड आकारला जातो. कोरोना मुळे हे आर्थिक वर्ष राज्यातील नागरिकांना अत्यंत हलाकिचे जाणार आहे. त्यामूळे घर पट्टी बिलात लावली जाणारी प्रती माह 2% शास्ती मध्ये सुद्धा सर्वांना सरसकट 100% सूट मिळणे आवश्यक आहे.
कोरोना च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने राज्यातील सर्व नगरपरिषदेच्या घरपट्टी बिला मध्ये जर 25% सवलत दिली व प्रतिमाह लागणारी 2% ची शास्ती 100% माफ केली म्हणून राज्याच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त बोजा वाढणार नाही. उलट अशी सवलत विशिष्ट मुदतीसाठी लागू केली तर नागरिक आनंदाने मुदतीत कर भरतील व त्यामूळे नगरपरिषदेवर सुद्धा कोणताही बोजा पडणार नाही. आणि या सवलती मुळे नागरिक सुद्धा कर भरण्यास प्रोत्साहीत व प्रेरित झालेने नगरपरिषदांचा वसुली वाढीस लागुन मुदतीत कर वसुल होईल. असा निर्णय यापूर्वी मुंबई महानगर पालिकेने घेतला असल्याचे ऐकिवात आहे.
तरी आपणास विनंती की, राज्यातील सर्व नगरपरिषदेच्या घरपट्टी बिला मध्ये सरसकट 25% सवलत देवून बिला मध्ये प्रती माह लागणारी शास्तीसुद्धा सरसकट सर्वांना 100% माफ करावी तसेच पाणीपट्टी मध्ये सुद्धा 25% सवलत लागू करने कामी संबंधीत विभागाला योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती ढुस यांनी केली आहे.
आप्पासाहेब ढुस यांची ही विनंती मान्य झाली तर समाजातील प्रत्येक घटकाला याचा लाभ होणार असल्याचे मत ढुस यांनी व्यक्त करुन ही मागणी सुद्धा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महोदय लवकरच मान्य करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

