shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावळीविहिर खुर्द व चांदेकसारे शिवारात बिबट्याचा संचार..वनविभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी ..!!

सावळीविहिर खुर्द व चांदेकसारे शिवारात बिबट्याचा संचार..
वनविभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी ..!! 
सावळीविहीर (राजकुमार गडकरी) 
राहता तालुक्यातील सावळीविहिर खुर्द व चांदेकसारे शिवारात सध्या बिबट्याचा संचार असल्याचे बोलले जात असून येथील रहिवासी व शेतकऱ्यांनी गेल्या एक दोन दिवसापूर्वी या परिसरात दोन बिबटे व दोन बछड्यांना पाहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच या परिसरातील रहिवाशी व शेतकऱ्यांकडून येथे वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


 सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन मुळे फारशी वर्दळ गावांमध्ये नाही तसेच नाशिक व शिर्डी महामार्गावरही वाहनांची वर्दळ नाही त्यामुळे रानातून ,जंगलातून हे बिबटे पाण्याच्या शोधार्थ सावळीवीहिर खुर्द व चांदेकसारे शिवालगत,बागायती भागात  आले असण्याची दाट शक्यता आहे. या परिसरातील ननवरे वस्ती जवळील उसाच्या शेतात हे  बिबटे व बछडे काहीनी पंधरा दिवसापूर्वी पाहिले होते . तसे या वस्तीवरील नन्नवरे कुटुंब सांगत आहे, त्यानंतर परवा दिवशी रात्री नन्नवरेवस्ती शेजारीच असणाऱ्या भोसले कुटुंब हे आपल्या घरासमोर बसलेले असताना त्यांना अचानक उसाच्या शेतातून एक नर व एक मादी आणि दोन बछडे आल्याचे पाहण्यात आले. त्यानंतर ही गोष्ट त्यांनी सकाळी परिसरात सांगितल्यानंतर आसपासच्या रहिवाशांनी या शेताच्या परिसरात पाहणी केली असता तेथे काही मारलेल्या कुत्र्यांची हाडे व मांस पडलेले दिसले. असे तेथील नागरिक सांगत आहेत, तसेच  चांदेकसारे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर होन या भागात आपल्या व्यवसायानिमित्त फिरत असतात त्यांनी व होन दादा सिताराम यांनी या गोष्टीला  दुजोरा दिला आहे.बिबट्यांचे पायाच्या ठसे  शेतात दिसून येत आहेत.येथे ऊस व इतर उभी पिके शेतात असल्याने व बागायती भाग असल्याने मुबलक पाणी असल्याने या परिसरात या बिबट्यांचा संचार आहे. मात्र प्रत्यक्ष दर्शनी पाहणाऱ्यांनी सांगितले की, येथे तीन बिबटे व दोन बछडे असून ते उसाच्या शेतात दिवसभर असतात मात्र त्यामुळे या परिसरातील रहिवाशी, शेतकऱ्यांना मात्र दहशत निर्माण झाली आहे. कारण या परिसरात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गायी, बैले, म्हशी, शेळ्या आदी पाळीव प्राणी आहेत या पाळीव प्राण्यांवर ते हल्ला करू शकतात किंवा लहान मुलांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही . नाशिक शिर्डी महामार्गावर सावळी खुर्द चांदेकसारे या शिवारात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनाही दिसून,आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागात बिबटे दिसल्यापासून मोठी भीती निर्माण झाली आहे. तरी या भागात वन विभागाने सापळा रचून, पिंजरा लावून  त्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी चांदेकसारे व सावळीविहिर खुर्द सीमेवरील रहिवाशी शेतकऱ्यांनी केली आहे.
close