खरे तर मला कुणाची स्तुती करून प्रसिध्दी मिळविण्याचा हेतू नाही. हे अगोदरच स्पष्ट केलेले बरे कारण सत्य हे कडू असते ते पचवणे जड असते. समाजासमोर खरे आणि परखड मांडणे हेच माझे ध्येय असल्याने पत्रकाराच्या नजरेतून माझी भूमिका मांडत आहे .माझ्या या लेखाने अनेक राजकीय तर्क केले जातीलही पण हा लेख पूर्णपणे वाचल्यावर प्रतिक्रिया देण्यास विसरू नका. गेली अनेक वर्षे आपण सगळ्या पक्षाचे राजकारण, समाजकारण आणि मंत्रिमंडळ बघत आलो आहोत. राजकारण म्हटले की, कुरघोडी, डावपेच, फोडाफोडी, घोडेबाजार, उलटसुलट चर्चा, हे मुद्दे पत्रकाराला नवे नाहीत. याच मुद्दय़ावर एक पान लेख तयार केला जातो. जे घडणार नाही ते घडवून आणन्याची किमया सुध्दा लेखणीतून प्रकट करावी लागते. त्यालाच लेखणीची ताकद म्हणतात. मी एक साधा पत्रकार संपादक श्री साम्राज्यमधून सरकार स्थापन होण्याच्या अगोदरच ठाकरे सरकार येणार हे ठामपणे लिहले होते. त्यामध्ये मी हे पण नमूद केले होते की, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार बनवले जाईल. त्यानंतर महाराष्ट्रात जे राजकारण घडले त्याला आपण सगळे साक्षीदार आहात. महाराष्ट्रात राजकारण करणे खूपच कठीण आहे. सत्ता मिळवण्याची व ती टिकवून ठेवण्याची कसरत जो करतो तोच खरा प्रमुख पदावर विराजमान होऊ शकतो हे सत्य नाकारता येणार नाही. सध्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे या पदावर नक्कीच योग्य आहेत हे त्यांनीं पटवून दिले आहे. प्रशासकीय कोणताही अनूभव पाठीशी नसताना, संपूर्ण सत्ता रिमोट प्रमाणे स्वतःच्या हाती असताना, राजकीय मैदानात उतरून लढवय्याप्रमाणे वाघासारखा लढणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा बघितला.
मुख्यमंत्री पद मिळवताना होणारी जीवाची घालमेल आणि विरोधकाच्या टिका याना समोर जाऊन निर्णायक बाजू मांडून महाराष्ट्राला स्थिरता देणे गरजेचे होते. याचसाठी घेतलेला निर्णय योग्य व खरा ठरला. सरकार स्थापन करून नविन करण्याचा ध्यास असताना सरकारच्या परीक्षेची वेळ आली आणि समोर उभे राहिले ते कोरोना या विषाणूचे मोठे संकट. जगभरात कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे, तर लाखापेक्षा जास्त बळी घेतलेत. यात आता धक्कादायक माहिती येते आहे, कोरोनाव्हायरस स्वत:मध्ये मोठे बदल करत आहे. कोरोनोव्हायरसने आतापर्यंत स्वत:मध्ये 10 बदल केले, आता तो अकराव्या रूपात आला आहे आणि त्याचं अकरावं रूप खूपच भयंकर आहे. असे असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून महत्वाची भूमिका मांडणारा आणि सर्व पक्षाचे प्रमुख यांना सोबत घेऊन संयम, शांत वा विचारपूर्वक धाडसी निर्णय घेतले. कोरोना हा न दिसणारा राक्षस जो देश पोखरून टाकायला आला त्याला दोन हात करतो आहे. हा राक्षस म्हणजे पाठीवर वार करणारा आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीवर तो हल्ला करतो आहे. जात, धर्म, पंथ, आणि माणूस असा कोणताच भेदभाव न ठेवता सगळ्यांना त्याच्या विळख्यात घेत आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढत आहे. केंद सरकार आणि राज्य सरकार यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली दिग्गज नेते याना सोबत घेऊन जनतेला वेळोवेळी धीर देऊन सोशलमिडिया मार्फत संपर्क करतात. डॉक्टर, पोलिस, पत्रकार, आरोग्यसेवा देणारे, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, दानशूर उद्योजक, तसेच मदतीचा हात देणारे सगळे यांचे मनापासून आभार मानणारा मुख्यमंत्री वेगळाच. लॉकडाऊन झाल्याने सगळी व्यवस्था बिघडली आहे. लहानमोठे उद्योग,रोजंदारीवर काम करणारे मजूर, रिक्षा व टक्सी चालक, असा मोठा अर्थचक्र चालवणारा समूह ठप्प झाल्याने राज्याची घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हे पूर्ववत होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. याची कल्पना मुख्यमंत्री यांना आहे. या संकटावर मात करायची असेल तर सर्व नागरिकांनी सरकारला सहकार्य करायला पाहिजे हे सुध्दा तितकेच खरे आहे.
लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की नाही हे सगळे आपल्या वागण्यावरून समजेल. तरीपण प्रतिबंधित क्षेत्रात ग्रीन, येलो, आणि रेड झोन असा विभाग करून काही अटी व शर्ती जावून उपाययोजना करण्याचा सरकारचा डाव आहे. आणि तसे करणे हे क्रमप्राप्त आहे. कारण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करायचा असेल तर काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. परप्रांतीय मजूर, कामगार, यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचा विचार सर्वानुमते मान्य असला तरी याला गती मिळणे महत्वाचे आहे. असे धोरणात्मक निर्णय घेताना राजकारणाला कलाटणी मिळते. घटनात्मक विचार केला किंवा त्याचा आधार घेतला तर विरोधक बरोबरच असतात. पण त्यालाही काही काळ वेळ आणि प्रसंग असावा लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तम कामगिरी करताना त्यांना विचलित करून राजकारण करण्याचा मनसुबा पुढे आला. याबाबत सांगताना जास्त काही बोलावे असे वाटत नाही कारण कितीही प्रयत्न केले तरी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच राहतील कारण एक दिलखुलास, संयमी आणि दिलदार नेता महाराष्ट्राला मिळणार आहे . म्हणूनच महाराष्ट्राचा वाघ आणि लढवय्या मुख्यमंत्री हेच बोलण्याची वेळ आली आहे.
अरूण ठोंबरे
पत्रकार/संपादक
9322107521/9527154112


