shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोरगरिबांसाठी सिंधुताई विखे पाटील अन्नदान योजनेतून मिळणार पाच रुपयात भोजन पाकिट...!!

सावळीविहीर।राजकुमार गडकरी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लाॅकडाऊन सुरु असून या आपत्तीजनक परिस्थितीत गोरगरीब सर्व सामान्य  कुटुंबांना कामधंदे नसल्याने पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याचे माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सिंधुताई विखे पाटील अन्नदान योजने अंतर्गत गोरगरिबांना पाच रुपयात भोजन पाकिटे देण्यात येत असून या योजनेचा सावळीविहीर  बु।। तालुका राहता येथे मातृदिनापासुन शुभारंभ करण्यात आला आहे.  



सावळीविहीर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर अंतरा अंतरावर गोलाकार निशाणी करून लाभार्थींना उभे करत शोशल डिस्टन्स पाळत या भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले.यावेळी राहाता कु उ बा समितीचे संचालक बाळासाहेब जपे,पं.स,.उपसभापती ओमेश जपे, सरपंच रुपाली आगलावे,उपसरपंच वु्षाली जपे, शिवाजी आगलावे, गणेश आगलावे, शांताराम जपे,कैलास पळसे,  सुरेश वाघमारे,सोपान पवार ग्रामपंचायत सदस्य व  कार्यकर्ते उपस्तिथ  होते.यावेळी लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करून भोजन पाकीटे वाटण्यात आली.  नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७०० गरजवंतांना हि पाकिटे देण्यात आली. या एका पाकिटामध्ये  लापशी व खिचडी होती. यावेळी येथे चोख नियोजन  ठेवण्यात आले होते. या योजनेमुळे गावातील गरजवंत व रस्त्या वरून येणाऱ्या जाणाऱ्या काही परप्रांतीय मजुरांनाही कार्यकर्त्यांनी हि अन्न पाकिटे कार्यकर्त्यांनी स्वतः घेऊन मोफत वाटली. हि योजना दररोज राज्यात लॉकडाउन असे पर्यंत  सुरु राहणार आहे.सर्वांनी अन्न पाकिटे  घेतांना सोशल डिंस्टन्स पाळावे, मास्क लावावे, गर्दी करू नये.असे आवाहन यावेळी  करण्यात आले.दुसर्या दिवशीही अनेकानी लाभ घेतला.या कार्यासाठी केशव जपे,दिलीप रक्ताटे,आदी त्यासाठी झटत आहे.
close