*जिल्हाधिकार्यांच्या "सेतु" ला दप्तर दिरंगाई ने रोखले..!*
देवळाली प्रवरा - दि. 30 मे 2020
महा ई सेवा केंद्र (सेतु) सुरू करणे बाबद देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे विनंतीवरुन अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा. राहुल द्विवेदी यांनी सेतु सुरु करणे बाबत च्या नियमोचीत कार्यवाही चे दि. 21 मे चे आदेश राहुरी तहसिल कार्यालयात दि.30 मे पर्यंत पोहचलेच नाहीत. त्यामूळे जिल्हाधिकार्यांच्या "सेतु" ला दप्तर दिरंगाई ने रोखले बद्दल ढुस यांनी अहमदनगर चे मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आज पत्र पाठवुन कळविले आहे.
आप्पासाहेब ढुस यांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, मा. मुख्यमंत्री महोदय यांना व अहमदनगर चे जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र पाठवुन आम्ही राज्यातील सेतु सुरु करण्या बद्दल विनंती केली होती.. त्यात आम्ही लिहिले होते की, महोदय...,आपल्या मार्गदर्शनाखाली राज्यातील लॉक डाउन हळू हळू शिथिल होत आहे. त्यामूळे राज्यातील शाळा महाविद्यालये लवकरच सुरू होतील यात शंका नाही.जुन 2020 पासून मुलांच्या नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. काही पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे ऑनलाइन अभ्यास व परिक्षेसाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे.
मात्र या ऑनलाइन शैक्षणिक प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याकरिता आवश्यक असणारे कागदपत्र मिळण्यासाठी राज्यातील सर्व महा ई सेवा सेतू कार्यालय बंद असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. सध्या विविध कोर्सेस च्या प्रवेशासाठी असणाऱ्या जसे की Neet UG, PG, AI AP GET, व इतर काही परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जसे EWS, नाॅन क्रिमिलियर,Certificate, उत्पनाचा दाखला, Caste Certificate ची आवश्यकता आहे. तथापी सेतू कार्यालये बंद असल्याने विध्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. तसेच सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी विविध कागदपत्रांची जुन जुलै मध्ये गरज पडणार आहे व त्याची तरतूद आत्ताच होणे आवश्यक आहे अन्यथा ऐनवेळी सेतु कर्यालयामध्ये मोठी गर्दी उसळून प्रश्न निर्माण होणार आहेत.
करिता राज्यातील महा ई सेवा केंद्र (सेतु) तातडीने सुरू करनणे बाबत आवश्यक ती उपाययोजना करणे कामी संबंधीत विभागाला योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती केली होती.सदर विनंतीस मान देऊन अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा. राहुल द्विवेदी साहेब यांनी मा. उप जिल्हाधिकारी, महसूल विभाग यांना नियमोचित कार्यवाहीसाठी पत्र क्र 1533/2020 दि. 21/05/2020 अन्वये कळविले आहे. तथापी आज दि. 30/05/2020 पावेतो राहुरी तालुक्यातील सेतु कार्यालये सुरु झालेले नाहीत. तसेच त्याबद्दल राहुरी च्या तहसिल कार्यालयाला अद्याप कोणत्याही सुचना प्राप्त झाल्या नाहीत असे समजते. ई.मेल च्या जमान्यात अहमदनगर येथून राहुरिला आदेश येण्यासाठी आठ दिवस लागतात त्यामूळे येथील विद्यार्थी, पालक व नागरिकांमधे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अहमदनगर च्या जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाला दप्तर दिरंगाईने रोखले असल्याच्या चर्चेने जनतेच्या सहनसीलतेचा सेतु कोसळू शकतो, व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राहुरी तहसिल समोर सेतु कार्यालये सुरु करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांचे मोठे आंदोलन उभे राहू शकते व त्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो याची कृपया नोंद घ्यावी.
सबब कार्यालयाला विनंती की, राहुरी तालुक्यातील सेतु कार्यालये सुरु करण्या बाबद संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी दुबार विनंती ढुस यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना केली असुन लवकरच सेतु कार्यालये सुरु होतील व विद्यार्थी व पालक यांचे प्रश्न मार्गी लागतील असा विस्वास आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केला.

