हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.31,हिंगोली शहरालगत असलेल्या अकोला बायपास बळसोंड परिसरातील प्रविणनगर येथील शिवनेरी हेल्थ क्लब मध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती सोशल डिस्टन्सचे सर्व नियमाचे पालन करीत
साजरी करण्यात आली.
आज दि.३१ मे ला ठिकठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरालगत असलेल्या बळसोंड परिसरातील प्रविणनगर येथेही हरिओम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवनेरी हेल्थ क्लब मध्ये राजमाता अहील्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम हरिओम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पप्पुभाऊ चव्हाण यांच्या हस्ते राजमाता अहील्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची पुजा पुष्पहार घालून करण्यात आली. यानंतर त्यांच्या जिवनचरीञावर पप्पुभाऊ चव्हाण,प्रा.अंभोरे यांनी विचार प्रगट केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमित धिके,दिलीप माने,राहुल धुळे,शिंदे सर,सुनिल बुडकेवर,बालाजी लाटकर,गोपी चव्हाण,सरोदे सर यांच्यासह पप्पुभाऊ चव्हाण मिञमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुञसंचलन राहुल धुळे तर आभार सुमित धिके यांनी मानले.


