shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकराज्य जनरल कामगार संघटनेतर्फे कामगार कायद्यामध्ये बदल करु पाहणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

कोल्हापूर।प्रतिनिधी:        
 कोल्हापूर जिल्ह्यातील संयुक्त कामगार कृती समितीच्या बरोबरच सांगरुळ ता. करवीर या ठिकाणी "लोकराज्य जनरल कामगार संघटनेच्या" वतीने संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी आपल्या घरासमोरच "कोरोना व्हॉयरस संसर्गजन्य" परिस्थितीचे सर्व नियम पाळून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कामगार कायद्यामध्ये अमानवी बदल करू पाहणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध म्हणून त्यांनी स्वतः च्या घरासमोर आपल्या पत्नी सौ. कांचन कांबळे यांच्या समवेत दंडाला काळी फित बांधून 22 मे 2020 हा दिवस निषेध दिन म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला.
        


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन भारतातल्या सर्व क्षेत्रातील कामगारांच्यासाठी कायदे बनवले, म्हणून सर्व कामगार स्वाभिमानाने जगत आहेत. त्या कामगार कायद्यामध्ये अमानवी बदल करण्याचे काम केंद्र सरकार करू पाहत आहे. मुठभर उद्योजक लोकांच्यासाठी खंडीभर कामगारांना वेठीस धरण्याचा डाव केंद्र सरकारचा असून, असे घडल्यास संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येतील. असा इशारा त्यांनी दिला. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व मार्गदर्शक सभासदांनीही आपापल्यापरीने पाठिंबा दर्शविला.
close