shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्सप्रेस चे भाकीत खरे ठरत आहे ग्रामीण महाराष्ट्र कोरोना ने पेटला

हिंगोली प्रतीनीधी:-गजानन गिरे गोरेगावकर
शिर्डी एक्सप्रेस ने दिनांक 18 ला भाकित वर्तवले होते की ग्रामीण महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे ते आज खरे ठरताना दिसत आहे शहरातून आलेले हजारो लोक कुठलीच सुरक्षितता न बाळगता खुलेआम फिरत आहेत आणि गाव पातळीची यंत्रणा अगदी सुस्त असुन केवळ शासकीय आदेशाचे सोपस्कार पार पाडत असल्याचे दिसत आहे आणि आपले मताचे राजकारण कोणाला न दुखावता शाबूत ठेवत असल्याचे दिसत आहे
     



आज मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका व गोरेगाव अप्पर तहसील भागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होत आहेत आता आलेल्या माहितीनुसार शेनगाव भागातील बरडा येथे 3 , खुडज येथे  9 असे एकूण सेनगाव तालुक्यातील 13 पाँझीटीव्ह रुग्ण आढळले तसेच  लिंबाळा काँरंटाईन सेंटरमधील ग्रामीण भागातील 31 रूग्ण आढळले तसेच गोरेगाव येथुन 3 किमी अंतरावरील सुरजखेडा येथे 1 रुग्ण आढळला तसेच गोरेगाव पासुन चार किमी अंतरावरील माझोड येथील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे त्या अनुषंगाने नुकतेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल सेनगाव चे तहसीलदार श्री जीवक कुमार कांबळे साहेब यांनी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन गोरेगाव येथील काय तयारी आहे याचा आढावा घेतला असता गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा अगदी सुस्त असल्याचे आढळले याप्रसंगी डॉक्टर सतीश रुणवाल यांनी गोरेगाव येथे या सात दिवसात किती लोक हॉट स्पॉट सिटी औरंगाबाद, मुंबई, पुणे ,नाशिक येथुन आलेले आहेत असे विचारले असता गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याकडे निश्चित आकडा उपलब्ध नव्हता यावरून प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव किती गंभीर आहे हे दिसते याप्रसंगी गोरेगावचे प्रतिष्ठित डॉक्टर रवी पाटील गोरेगावकर यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन गोरेगाव , सवना , व बाभूळगाव सर्कल मधील  पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक येथुन आलेल्या संशयीत लोकांचे त्वरित थ्रोट स्वाब घेऊन तपासणी करायला पाठविण्याची विनंती केली तसेच गोरेगाव येथे आमच्या प्रतिनिधीने कच्चा आढावा घेतला असता फक्त गोरेगाव या एका गावात जवळपास सहाशे ते साडे सहाशे लोक हे मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक या ठिकाणाहून आलेले आहेत परंतु गोरेगाव येथील काँरंटाईन सेंटरमध्ये केवळ दहा ते अकरा लोक काँरंटाईन केलेले आहेत यावरून ग्रामीण भागातील कारभारी आणि प्रशासन किती गंभीर आहे हे दिसते गोरेगावातून आढावा घेतला असता जनता अत्यंत भितीदायक वातावरणात जगत असून गोरेगाव येथील गाव कारभार्यांनी आणखी गंभीरपणे नियोजन करण्याची मागणी होताना दिसत आहे नसता येणारा काळ अत्यंत धोकादायक वळण घेणार असुन एकदा पेटलेला वनवा विझवता येणार नाही तेव्हा वेळीच उपाययोजना करण्याची मागणी जनतेतुन होत आहे
close