shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

४३ दिवसानंतर दारु दुकाने उडताच मद्यपींची नुसती झुंबड...; राहत्याला लाॅन्समध्ये बसवल्याने मद्यपी बनले जणे वऱ्हाडी..!!

सावळीविहीर। राजकुमार गडकरी :
देशात ,राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन काळात सर्व मद्य विक्री बंद होती.मात्र लॉकडाऊन टप्पा २ संपल्यानंतर चार मे पासून तिसरा टप्पा सुरू झाला असून या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये ,ग्रामीण भागात मद्यविक्रीची दुकाने काही अटी व शर्ती ठेवून सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी 43 दिवसानंतर मद्य विक्री आज मंगळवारी सकाळी सुरू झाल्यानंतर या मद्यविक्री केंद्रांवर दुकाने ,वाईन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 43 दिवस घरात बसलेले मद्यग्राहक मोठ्या संख्येने आज बाहेर पडून वाईन्स व दारूच्या दुकानावर त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते. राहता व श्रीरामपूर तालुक्यात मद्य ग्राहकांची वाईन्स शॉप वर आज मोठी गर्दी दिसून येत होती. राहता शहरात तर एकमेव वाईन शॉप आहे, त्यामुळे येथे राहत्याला मद्य घेणारे ग्राहक मोठ्या संख्येने जमा झाल्याने राहतेतील वाईन शॉप वाल्यांनी मद्य ग्राहकांना एका लॉन्स मध्ये बसवून त्यांना टोकन देऊन मग मद्य विक्री करण्यास सुरुवात केली जाणार होती. हे मद्य घेणारे लोक व त्यांच्या गर्दीमुळे ते या लॉन्स मध्ये आज जणू लग्नाला आले की काय असे यावेळी वाटत होते.एवढी मोठी गर्दी येथे होती.लॉन्समध्ये टोकन घेण्यासाठी शांत बसलेल्या या काही लोकांकडून मात्र सोशल डिस्टंन्स व मास्कचा वापर बंधनकारक असताना येथे मात्र नियम पायदळी तुडवले जावून प्रचंड गर्दी करण्यात आली होती. याची खबर प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, यांना समजताच या लॉन्सच्या ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन तेथील गर्दी पांगवली तसेच वाईन शॉप वर जाऊन हे वाईन शॉप त्वरित बंद करण्यात आले.

जिल्ह्यात लॉक डाऊन चा तिसरा टप्पा सुरू झाला, त्या मद्य विक्री दुकाने, वाईन्स,अटी व। शर्तीवर ग्रामीण भागात सुरू करण्यास परवानगी शासनाने दिली आहे.मात्र या अटी व शर्तींचा अनेक ठिकाणी भंग होत आहे. अहमदनगर,श्रीरामपूर सह राहत्यालाही असा प्रकार दिसून आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असताना व अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये येत असल्याने जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात काही गावात, शहरात मद्य विक्री दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली असल्यामुळे आजपासून 43 दिवसाने तालुक्यातील काही मद्यविक्री दुकाने अटी व शर्ती राखून उघडण्याचे परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे राहता येथील वाईन शॉप आज  43 दिवसांनी उघडण्यात आले, 43 दिवस घरात बसून असलेले मद्य ग्राहक यांनी मद्य घेण्यासाठी राहता वाईन शॉप येथे मोठी गर्दी केली.त्यामुळे वाईन्स मालकाने आपल्याच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील लॉन्स मध्ये सर्व ग्राहकांना पाठवून तेथे सर्वांना या लॉन्स व मंगल कार्यालय मध्ये खुर्च्या टाकून तेथे बसण्याची व्यवस्था केली होती.चारशे ते पाचशे मद्य ग्राहक याठिकाणी लॉन्स मध्ये होते.यामध्ये ग्राहकांना टोकन देवुन रिक्षाने दीड किलोमीटर राहता शहरात पाठवले जाणार होते. ग्राहकांकडून दहा रुपये रिक्षा भाडे व पाच रुपये मद्यपरवाना फी घेतली जाणार होती व परत लॉन्स वर आणून सोडले जाणार होते.असे यावेळी मद्य ग्राहक बोलत होते. या वाईन्सवर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना या लॉन्स मध्ये खुर्च्या टाकून बसवण्यात आले होते.यामध्ये हे ग्राहक एखाद्या लग्नाला आले की काय असे जणू या लॉन्स मध्ये वाटत होते. सिद्ध संकल्प लॉन्स मंगल कार्यालय मध्ये एकाच वेळी चारशे ते पाचशे लोकांची गर्दी सोशल डिंस्टन्स पुरता फज्जा उडाला होता.अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. ही खबर प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डीचे  पोलीस विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व राहाता, शिर्डी चे पोलीस निरीक्षक यांना कळताच त्यांनी त्वरित पोलीस पथकासह सिद्ध संकल्प लॉन्स वर धाव घेतली व तेथे जाऊन सर्व गर्दी पांगवली, लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून जिल्ह्यात संचारबंदी व 144 कलम लागू आहे. एकाच ठिकाणी मोठी गर्दी करता येत नाही.शिवाय लॉन्स ,मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश आहेत. असे असताना या लॉन्स मध्ये एवढी मोठी गर्दी होणे हे अटी व नियमाचे भंग नाही का..? असा सवाल नागरिक करीत आहेत. लॉन्समधील मद्य ग्राहकांना पोलिसांनी पांगवले व वाईन्स शॉप उघडण्यापूर्वी ते बंद केले.शासकीय अधिकाऱ्यांनी या लॉकडाउनच्या काळात अटी व शर्ती न पाळल्यामुळे हे वाईन्स त्वरित बंद केल्याने व वेळीच दखल घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. असाच प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे, गेले त्रेचाळीस दिवस लॉक डाऊनमुळे प्रत्येक जण घरात आहे. त्रेचाळीस दिवस घरात बसून असलेला मद्य ग्राहक मोठ्या संख्येने आज




बाहेर पडला, जिल्ह्यात , राहता , श्रीरामपूर तालुक्यात म्हणा मद्यपींची संख्या  किती आहे ,मद्य विक्री किती प्रमाणात होत असते.याचा अंदाज आजच्या या चित्रावरुन स्पष्ट होत आहे.अशी चर्चा राहता व श्रीरामपूर तालुक्यातआज दिवसभर होत होती.


close