पिंपरी-चिंचवड:
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ७५ दिवसांत तीनशेचा आकडा पार केला आहे. आज दिवसभरात ४६ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजपर्यंतच्या बाधित रूग्णांचा आकडा ३११ वर पोहचला आहे. शहरातील १११ रूग्ण सध्या महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर आजवर १६ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यातील ७ जण शहरातील रहिवासी होते. दरम्यान आज ९ रूग्णांना डिस्चार्ज दिल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६९ झाली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज चिंचवड स्टेशन, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी, वाकड, भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा व खडकी पुणे येथील रहिवासी असलेल्या ४६ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वाधिक आकडा असून शहरावासियांची चिंता वाढली आहे. शहराला कालच रेडझोनमधून वगळले असून बाजारपेठ, दुकाने सुरू केली आहेत. कालपासून तर रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काल एकाच दिवशी २१ तर आज ४६ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. सुरुवातीला सोसायटीत आढळलेला कोरोना आता मध्यमवर्गीय वस्तीतून झोपडपट्टीत शिरला आहे.
शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या चिंचवड स्टेशन येथील आंनदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली असून ६० हून अधिक रुग्ण झोपडपट्टीत सापडले आहेत. त्याचबरोबर शहराच्या नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरील डोकेदुखी वाढली आहे. त्यातच शहरातील निर्बंध शिथिल करत जनजीवन सुरू केले आहे. नागरिकांची बाहेर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
सध्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत सध्या शहरातील १११ जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत बाधा झालेल्यांमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. पण, ज्या प्रमाणात रुग्ण वाढताहेत, त्या प्रमाणात कमी सुद्धा होताहेत. कोरोनाविरुद्ध लढण्या-या डॉक्टर, नर्स, सेवक, पोलिस, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या लढ्याला यशही येत आहे. हीच जमेची बाजू मानली जात आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे कोरोनावर मात करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
शनिवार दि.२३ मे २०२० अपडेट्स सायं. ७.०० वाजेपर्यंतचे
आजपर्यंत एकूण कोरोना पॉझिटीव्ह = ३११
आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = ४६
सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = १११(उर्वरित शहराबाहेरील रूग्णालयात)
एकूण मृत संख्या = १६(PCMC ०७ + ०९ शहराबाहेरील)
एकूण कोरोनामुक्त रूग्ण =१६९(आज ०९ रूग्ण डिस्चार्ज)
आज दाखल संशयित रूग्ण = १२०
आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = १२२
प्रतिक्षेतील अहवाल = ३७७
एकूण होम क्वारंटाईन = १०४६१
दैनंदिन सर्व्हेक्षण = १०५९७५
आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे चिंचवड स्टेशन, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी, वाकड, भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा व खडकी पुणे येथील रहिवासी आहेत.
आज इंदिरानगर चिंचवड, आकुर्डी, चऱ्होली व थेरगाव येथील रहिवासी असलेले ०९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
खालील सर्व परिसर आज मध्यरात्री ११ वाजलेपासून कंन्टेनमेंट झोन घोषीत करुन पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेला आहे.
०१) पिंपरी कॉलनी, पिंपरी (साई चौक – आय.सी.आय.सी.आय. बँक एटीएम – डेरा संत बाबा हरिया सिंग दरबार – शाम सुंदर सुपर मार्केट – श्री मुद्रा गणेश मंदिर – गे लॉर्ड चौक – महादेव पॅटीस वाला – साई चौक)
०२) वाकड पोलिस लाईन, वाकड (सिसिम स्ट्रीट स्कुल – श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड – श्री गणेश सुपर मार्केट – आय.सी.आय.सी.आय. बँक एटीएम – सिसम स्ट्रीट स्कुल)
०३) अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी (पी.एस. रेसिडन्सी – देविका स्टेशनरी – अलंकापुरम रोड – पदमावती दुध डेअरी – पी.एस. रेसिडन्सी)


