- राहत्याला लाॅन्समध्ये बसवल्याने मद्यपी बनले जणू व-हाडी ..!!
सावळीविहीर। राजकुमार गडकरी।
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून सर्वत्र संचारबंदी लागू आहे.मात्र अत्यावश्यक सेवा व काही दुकानांना ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये शासनाने अटी व शर्ती आणि वेळा ठरवून उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी अटी व शर्ती आणि लॉक डाऊनच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
सावळीविहीर येथील बाजार तळावर आज मोठ्या संख्येने भाजी विक्रेते व इतर वस्तू व विकणाऱ्याची सकाळी गर्दी झाली होती. तसेच घेणाऱ्यांनीही मोठी गर्दी केल्याने लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवले जात होते.गेले 43 दिवस घरात बसलेले लोक, महिला जणूकाही सर्व सैल झाले आहे असे समजून आज घराबाहेर पडल्याचे दिसून येत होते. सावळीविहीर येथे आज बाजारतळावर मोठी गर्दी झाल्याने व ही माहिती पोलिसांना समजतात शिर्डी पोलिसांचे पथक येथे येऊन बाजारतळावर भरलेला मिनी बाजार पांगवण्यात आला एवढेच काय तर शिर्डी, राहता ,सावळीविहीर, येथे नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या संख्येने आज मोटरसायकली ,कार ,यांची वर्दळ वाढली होती.43 दिवस शांत शांत सुनासुना वाटणारा हा नगर मनमाड-महामार्ग रस्ता आज मात्र मोटरसायकली ,कार ,इतर वाहने यामुळे वर्दळीने गजबजून गेल्याचे दिसून येत होते.अत्यावश्यक सेवेची दुकाने व इतर काही दुकाने आज स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्रेचाळीस दिवसानंतर अशी दुकाने उघडल्यामुळे व घरात बसून असलेल्या नागरिकांनी खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडणे सोपे समजून उघडलेल्या दुकानांवर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते, अनेक ठिकाणी अनेकांनी सोशल डिस्टंन्स व मास्क लावले नव्हते.अनेक ठिकाणी पोलिसांना येऊन गर्दी हटवणे भाग पडत होते. आज शासनाने लॉक डाऊन टप्पा 3 मध्ये काही दुकानांना मुभा काही वेळेपुरती दिली असली तरी पहिल्याच दिवशी असा नागरिकांकडून नियम ,अटी, शिस्त याचे उल्लंघन होत आहे असे दिसून आले.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. लॉक डाऊन चा तिसरा टप्पा सुरू असून संचारबंदी जारी आहे. कुणीही गर्दी करू नये, सोशल डिंस्टन्स पाळावेत, विनाकारण दुकाने उघडली म्हणून खरेदीच्या बहाण्याने बाहेर फिरू नये.घरातील एकच माणसाने आवश्यक असल्यास तरच खरेदीसाठी बाहेर यावे असे आवाहनही शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.अन्यथा अशांवर, नियम मोडणांऱ्यावर कडक कारवाई केली जाईल.असा इशाराही शासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.


