shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विधान परिषद निवडणूक ; इंदापूर ला मिळणार तिसरा आमदार


> हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागणार ..शक्यता ..!!

पुणे : प्रतिनिधी:
राज्यात विधान परिषद रिक्त झालेल्या नऊ जागा पैकी निवडणूक जाहीर करण्यात आली, हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांचे विरोधात असल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकत वाढविण्यासाठी पाटील यांना बळ दिले जाण्याची शक्यता आहे,



विधान परिषद नऊ जागा पैकी भाजप 4 जागा लढवणार असल्याचे  निश्चित आहे, बारामती लोकसभा मतदार संघ  1जागा मिळण्याची शक्यता आहे, भाजपने पश्चिम महाराष्ट्रात मोठे यश मिळवून 2014 ला सत्ता स्थापन करण्यात मिळवले होते  मात्र 2019 ला पश्चिम महाराष्ट्रात भाजपला यश मिळाले नाही, पश्चिम महाराष्ट्र सातारा येथील उदयन राजे यांची राज्य सभे वर निवड करण्यात आली, पुणे जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदार संघात भाजपाने आपली ताकत वाढविण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची विधान परिषदेसाठी वर्णी लावण्यासाठी शक्यता निर्माण झाली आहे, पाटील यांनी मंत्री म्हणून 19 वर्ष  काम पाहिलं आहे, इंदापूर तालुक्यात भाजपाचे  वर्चस्व असून राष्ट्रवादी काँग्रेस पवार कुटुंब यांना भाजपाचा मोठा विरोध आहे, पाटील हे स्वर्गीय शंकर राव पाटील हेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पासून अलिप्त होते, त्यामुळे भाजपाकडून पाटील यांना ताकत मिळेल अशी शक्यता आहे, तसेच  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भाजपाच्या वतीने विधान परिषदेत निवड झाल्यास इंदापूर तालुक्याला ३ आमदार लाभणार आहेत. तालुक्यातील विद्यमान आमदार तथा राज्य मंत्री दत्ता मामा भरणे, तालुक्यातील सेल गाव येथील असून, मोहोळ तालुक्यातील आमदार यशवंत माने सध्या कार्यरत आहेत.


शुभेच्छूक :
शिव छावा मावळा शशिकांत जाधव,
बापूराव दत्तात्रय लष्कर.
close