पारनेर प्रतिनिधी :
राज्यभरात कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत असताना निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे सर्व पदाधिकारी हितचिंतक आमदार लंके यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य किराणा व भाजीपाला वाटप करताना दिसून येत आहे.सरकारने ३ मे पर्यंत असणारा लॉक डाऊन १७ मे पर्यंत वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.त्यातच मोलमजुरी करून आपली उपजीविका चालविणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
या गोरगरीब नागरिकांची लॉक डाऊन काळात उपासमार होऊ नये म्हणून आ.निलेश लंके प्रतिष्ठाण राहाता तालुका यांनी पुढाकार घेत गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात निलेश लंके प्रतिष्ठान राहता यांच्या बरोबर प्रहार जनशक्ती पक्ष संघटना राहाता तालुका यांनी सहभाग घेत सोमवारी राहाता तालुक्यातील ममदापुर येथील अनेक गरीब कुटुंबांना गहू,तांदूळ,भाजीपाला असे जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ममदापुर येथील काही महिलांनी कठीण काळात आधार दिल्याबद्दल आ.निलेश लंके प्रतिष्ठाण राहता तालुका व प्रहार संघटनेचे आभार मानले.....
याप्रसंगी आ.लंके प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष.नितीन गाढवे,कार्याध्यक्ष, अमोल शेळके, प्रताप कोते,साईराज बिडवे,वाल्मिक शेळके,अजित सदाफळ,उन्मेष साळुंके,चेतन गाढवे,वैभव लोंढे,प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष दिनेश शेळके,भाऊसाहेब गमे,महेश शेळके,केतन शेळके,रोहित गायकवाड शुभम गमे आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.तर ममदापुर येथील स्व.भास्कर मनोहर कदम प्रतिष्ठानचे अतुल कदम,जयदीप गाडे यांचे विशेष सहकार्य लाभले .....
चौकट :
आमदार निलेश लंके हे गेले काही आठवडे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोणा या जैविक युद्धाला शह देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्यांच्या समाजाभिमुख कार्यावर प्रेरित होऊन,महाराष्ट्रभर असणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य व भाजीपाला वाटप करताना दिसत आहे.यापूर्वीही निलेश लंके प्रतिष्ठान राहताच्या माध्यमातून राहाता तालुक्यात भाजीपाला व किराणा वाटप करण्यात आले होते.यापुढेही राहता तालुक्यातील अनेक गावात गोरगरीब जनतेला,निराधारांना आधार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू .
श्री.अक्षय गोर्डे
( निलेश लंके प्रतिष्ठान राहता तालुका अध्यक्ष )

