राहाता । प्रतिनिधी:
मागील दीड महिन्या पासून कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊन असल्यामुळे गोरगरीब मोलमजूरी, बिगर रेशन कार्ड धारक यांची उपसमार होऊ नये म्हणून आमदार निलेश लंके प्रतिष्ठान कडून मागील 15 दिवसात अस्तगाव ममदापुर परिसरात भाजीपाला व धान्य वाटप करण्यत आले.
त्यांनतर काल आमदार निलेश लंके यांनी 50 कुटुंबासाठी (50 किट मीठ ,तेल ,मिर्ची पॉवडर ,हलद पावडर, चहा पाउडर ,साखर ,तांदुल ,बेसन पीठ ,दाळ आटा ) पोहच केल्या व जगदंब युवा प्रतिष्ठान यांनी (120 भाजीपाला किट कोबी ,भोपळा, वांगे कांदे टोमॅटो कोथिम्बीर मिर्ची ,बटाटे )भाजीपाला उपलब्द करुण दिल्यानंतर आज दोनही प्रतिष्ठान च्या वतीने गरजू लोकांना यशस्वी रित्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यत आले.
यासाठी आमदार निलेश लंके प्रतिष्ठान चे अक्षय गोर्डे , नितिन गाढ़वे , अमोल शेळके ,तुषार शेळके तसेच जगदंब युवा प्रतिष्ठान(वाकडी )चे राहुल शेळके पाटील ,कमलेश शेळके पाटिल , अक्षय उफाडे उपस्थित होते. याकामी कैलास लहारे ,पिनुभाऊ अभंग ,सामाजिक कार्यकर्ते गोरखभाऊ कोते ,अविनाश शेळके , किरण रसाळ , प्रताप कोते , सौरभ कोते , महेश शेळके , कृष्णा असाने ,केतन शेळके , संकेत गोरे , अवि उफाडे , पपु मैड ,आबा उफाडे ,प्रमोद उफाडे , विकास तनपुरे , ऋषिकेश उफाडे ,तुषार बोरावके ,किरण पारखे ,संदीप पावसे , पपु खजिनदार , विकास पावसे , बबलू लावरे यांचे सहकार्य लाभले.


