shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" माणुसकी हाच माझा धर्म...,गोरगरीब जनतेची सेवा हेच माझे कर्म. "


पारनेर ।प्रतिनिधी: 
माझे आस्तित्व असेपर्यंत माझ्या आसपास माझ्या जवळपास कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही..

कोरोणासारखे हजारो संकटे येतील जातील पण येणाऱ्या प्रत्येक संकटात गोरगरीब जनतेचा पाठीराखा बनुन मी सैदव त्यांच्या पाठीशी उभा राहील..



पद प्रतिष्ठा येतील जातील पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्म माझ्या मायबाप जनतेच्या पाठी उभा असेल...

सगळ जग धास्तवलेले अस आपणास वाटत असेल, पण या गोरगरीब जनतेला आधार देण्यासाठी मला मात्र मैदानात उतरून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या गोरगरीब जनतेला जमेल ती मदत करणे हे माझं मी कर्तव्य समजतो.. 

कोण काय करत या पेक्षा माझ्या मतदार संघातल्या लोकांना तर मदत करण माझ प्रथम कर्तव्य मी समजतो पण बाकीच्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या मजुरांना देखील जीवापाड जपणे त्याना आधार देणे ही माझी नैतिक जबाबदारी मी समजतो... 

माझे सहकारी नित्यनेमाने  ५००० लोकांचे दोन वेळेसचे जेवण, मजुरांना चपला नसेल तर चपला, चादरी, त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था,, त्या बस सुखरूप घरी पोहचल्या का ह्मा गोष्टीचाही पाठपुरावा करत आहे त्याना मी मनपूर्वक धन्यवाद देतो!

कुणाशी कसले ना नाते ना कोणता स्वार्थ, फक्त माणुसकी हाच धर्म आणि गोरगरीब जनतेची सेवा हेच कर्म माणुन सेवा करणे आपलं परम कर्तव्य आहे.
प्रत्येकाने आपली काळजी घेऊन सुरक्षित रहा आणि आपल्या परिवारची काळजी घ्या!

          आपलाच जनसेवक
    आमदार निलेश ज्ञानदेव लंके
पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ
close